‘Maharaja’ चित्रपटातून हिंदु धर्माविषयीची नकारात्मक दृश्ये हटवा; ‘एक्स’वर चालू आहे ट्रेण्ड

Maharaja या चित्रपटातील कथा १६२ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाची आहे, ज्यात वैष्णव पंथाच्या अंतर्गत असलेल्या वल्लभ संप्रदायाच्या साधूंवर महिला भक्तांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

147
‘Maharaja’ चित्रपटातून हिंदु धर्माविषयीची नकारात्मक दृश्ये हटवा; ‘एक्स’वर चालू आहे ट्रेण्ड
‘Maharaja’ चित्रपटातून हिंदु धर्माविषयीची नकारात्मक दृश्ये हटवा; ‘एक्स’वर चालू आहे ट्रेण्ड

अभिनेते आमिर खान यांचा मुलगा जुनैद खान याचा ‘Maharaja’ हा पहिला चित्रपट १४ जून या दिवशी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी मंचावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील कथा १६२ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाची आहे, ज्यात वैष्णव पंथाच्या अंतर्गत असलेल्या वल्लभ संप्रदायाच्या साधूंवर महिला भक्तांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हिंदुद्वेषी धोरण राबवण्यासाठी या घटनेचा आधार घेऊन बॉलिवूडचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा समोर आला आहे. याविषयी ‘एक्स’वरून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.

(हेही वाचा – FDI 2024 : थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ सर्वाधिक असणारी भारतीय राज्ये)

हिंदूंनी ‘एक्स’वर हा ट्रेंड चालू केला होता. तसेच, हिंदु धर्म आणि देवतांचा अनादर करणार्‍या अनेक वेब-सीरीज आणि चित्रपट नेटफ्लिक्सवर दाखवले जातात, त्यामुळे वापरकर्त्यांनी ‘#BoycottNetflix’ हा हॅगटॅग ट्रेंड केला आणि ‘नेटफ्लिक्सवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. हा ट्रेंड दुसर्‍या क्रमांकावर होता, तर ‘बॅन महाराज फिल्म’ या चित्रपटावर बंदीची मागणी करणारा ‘कीवर्ड’ ट्रेंड सहाव्या क्रमांकावर होता.

नेटकरी काय म्हणतात ?

या ट्रेंडवर एकाने लिहिले की, आधी आमिर खान याने हिंदूंच्या धार्मिक परंपरांचा अपप्रचार केला आणि आता त्याने तीच मशाल त्याच्या मुलाला दिली आहे; पण मदरसा आणि मशिदी यांत मौलवी करत असलेल्या गैरकृत्यांविषयी ते काहीच बोलत नाहीत.

बजरंग दलाचा इशारा

या चित्रपटाची कथा हिंदूविरोधी असल्यामुळे तो विवादात सापडला आहे. ‘या चित्रपटात हिंदु धर्म आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी नकारात्मक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. ही आक्षेपार्ह दृष्ये हटवण्यात यावी’, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘या चित्रपटात हिंदु धर्मगुरूंना खलनायक दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात हिंदूंचे धर्मांतर केल्याची दृश्येही दाखवण्यात आली आहेत. ही दृष्ये हटवली नाहीत, तर चित्रपटाला विरोध करू’, असा इशारा बजरंग दलाने इशारा दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.