Educational Scholarship : परदेशात शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

159
Educational Scholarship : परदेशात शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी २०२४-२०२५ मध्ये परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. (Educational Scholarship)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे. या अभ्यासक्रमांसाठी ॲक्टीव क्यूएस वर्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. (Educational Scholarship)

(हेही वाचा – काम पूर्ण होत नाही तोवर ‘No ब्रेक’; Amazon India ची कर्मचाऱ्यांना अमानवीय वागणूक!)

या योजनेअंतर्गत नजिकच्या काळात पालकांच्या कुटुंबाच्या उत्पन्न मर्यादेत तसेच जागांमध्ये वाढ झाल्यास त्यानुसार आवश्यक ते बदल आणि सुधारणा करून फेरअर्ज मागविण्यात येतील. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावेत, असे आवाहनही सहायक आयुक्त समाज कल्याण मल्लिनाथ हरसुरे यांनी केले आहे. (Educational Scholarship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.