Yogi Adityanath आणि सरसंघचालक मोहन भागवत भेटणार?; चर्चांना उधाण

350
Yogi Adityanath आणि सरसंघचालक मोहन भागवत भेटणार?; चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट होणार आहे. यामुळे राजधानीत अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (Yogi Adityanath)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे भाजपावर निशाणा साधला आहे. अयोध्येत झालेला पराभव तसेच उत्तर प्रदेशातही भाजपाला बसलेला फटका अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट होणार आहे. (Yogi Adityanath)

(हेही वाचा – Elon Musk : एलॉन मस्क यांच्या ५६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पे पॅकेजला गुंतवणुकदारांची मंजुरी)

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये आरएसएसचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यादरम्यान दोघांची भेट होणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मोहन भागवत यांनी गुरुवारी काशी, गोरखपूर, कानपूर आणि अवध क्षेत्रातील संघाची जबाबदारी सांभाळत असलेल्या जवळपास २८० स्वयंसेवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघाचा विस्तार, राजकीय स्थिती आणि सामाजिक मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते. (Yogi Adityanath)

उत्तर प्रदेशात पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील राजकीय स्थिती आणि संघ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी सत्ताधारी भाजपाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाचा उल्लेख अहंकारी करत त्यांनी टीका केली. तसेच इंडी आघाडीलाही त्यांनी राम विरोधी म्हटले आहे. (Yogi Adityanath)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.