वर्सोव्यात मागील दहा दिवसांमध्ये सात अनधिकृत इमारतींचे बांधकाम जमीनदोस्त केल्यानंतर या विभागाच्या सहायक आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांची शुक्रवारी बदलीचे आदेश जारी करण्यात आले. चौहाण यांची बदली एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदी करण्यात असून एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांची बदली के पश्चिम विभागात करण्यात आली आहे. (Ward Officer Transfer)
वेसावे परिसरात साचलेल्या गाळामध्ये मच्छीमार बांधवांना बोटी ठेवता येत नसल्याच्या तक्रारी मच्छीमारांकडून महाराष्ट्र सागरी मंडळास प्राप्त झाले होते. यानिमित्ताने के पश्चिम विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यासाठी आले असताना तिथे अनधिकृत बांधकामे आढळून आली. त्यामुळे प्रथम ०३ जून रोजी या परिसरातील अनधिकृत बांधण्यात आलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ११ जून रोजी आणखीन शिव गल्लीतील आणखी तीन इमारती आणि आज आणखीन एका इमारतीवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ७ अनधिकृत आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांच्या नेतृत्वाखाली करवाई करण्यात आली. (Ward Officer Transfer)
(हेही वाचा – Franceमध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर, कशी मिळाली, नेमकं काय लिहिलं आहे? वाचा सविस्तर)
महापालिका प्रशासनाच्या कामाचे कौतुक
अनधिकृत बांधकाम आणि इमारतींवरील ही कारवाई सुरु असतानाच शुक्रवारी चौहाण यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. चौहाण हे कोविड काळात एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त होते, त्यानंतर त्यांची बदली के पश्चिम विभागाच्या सहायक आयुक्तपदी करण्यात आली होती. वर्सोव्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामावर महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई सुरु असली तरी त्यांच्या कारकिर्दीत ही अनधिकृत बांधकामे झाल्याचा ठपका ठेवत ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, चौहाण यांच्या बदलीमागे राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे. (Ward Officer Transfer)
दरम्यान, चौहाण यांची बदली एफ उत्तर विभागांत करण्यात आली असून एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांची बदली चौहाण यांच्या जागेवर करण्यात आली आहे. अल्ले यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी होत होती. त्यातच चौहाण यांच्या बदलीची मागणी झाल्याने दोन्ही विभागांमध्ये खांदेपालट करून बदलीची प्रक्रिया महापालिका आयुक्तांनी पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. वर्सोव्यात मागील दहा ते बारा दिवसांमध्ये जी काही धडक मोहिम चालू आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त करत महापालिका प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले जात आहे. त्यातच चौहाण यांची बदली झाल्याने प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. (Ward Officer Transfer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community