धार्मिक महत्त्व नमस्काराचे वैज्ञानिक फायद्याबरोबरच धार्मिक फायदेही आहेत. नमस्कार केल्याने मनात चांगल्या भावना निर्माण होतात. हात जोडल्याने आणि डोके श्रद्धने खाली टेकवल्याने सकारात्मक भावना निर्माण होते तसेच आपल्या मनात मोठ्यांबद्दल आदराची भावना वाढते. यामुळे आपले मानसिक आरोग्यदेखील चांगले राहते.
हृदय राहते निरोगी आपल्या हातातील पेशी मेंदूच्या पेशींशी जोडलेल्या असतात. जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हातांचे तळवे जोडतो किंवा दाबतो त्यावेळी अनाहत चक्र (हृदय) आणि आज्ञा चक्र (भ्रुमध्य) सक्रीय होऊ लागतात. यामुळे सकारात्मकता निर्माण होते आणि मन शांत होते. मनातील भीती दूर व्हायला मदत होते. ह्रदयाचे आरोग्य सुधारते. आदरभाव व्यक्त करणे.