T20 World Cup 2024 : अमेरिका, कॅनडा सामना पावसात गेला वाहून, अमेरिका सुपर ८ मध्ये, पाकचं आव्हान संपुष्टात 

T20 World Cup 2024 : अमेरिकन संघाने आपल्या पहिल्याच टी-२० विश्वचषकात सुपर ८ फेरी गाठली आहे 

178
T20 World Cup 2024 : अमेरिका, कॅनडा सामना पावसात गेला वाहून, अमेरिका सुपर ८ मध्ये, पाकचं आव्हान संपुष्टात 
T20 World Cup 2024 : अमेरिका, कॅनडा सामना पावसात गेला वाहून, अमेरिका सुपर ८ मध्ये, पाकचं आव्हान संपुष्टात 
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान संघाच्या सुपर ८ मध्ये पोहोचण्याच्या आशा फ्लोरिडातील वादळी पावसात वाहून गेल्या आहेत. अमेरिका विरुद्ध आयर्लंड (America vs Ireland) हा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. अमेरिकन संघाचे (American teams) ४ सामन्यातून ५ गुण झाल्यामुळे त्यांनी सुपर ८ फेरी गाठली आहे. तर भारतापाठोपाठ अमेरिकेकडून पराभव झालेला पाकिस्तानचा संघ (Pakistan team) साखळीतच गारद झाला आहे. त्यांनी आता शेवटच्या आयर्लंड (Ireland) विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला, तरी त्यांचे ४ गुण होतील. अमेरिकेला ते मागे टाकू शकणार नाहीत. ए गटातून भारत आणि अमेरिका हे दोन संघ आता सुपर ८ मध्ये जातील. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Educational Scholarship : परदेशात शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन)

लाऊडरडेलला स्थानिक वेळेनुसार सव्वा दोन वाजता जरी सामना सुरू झाला असता तरी प्रत्येकी ५ षटकांचा सामना खेळवण्याची तयारी आयसीसीने ठेवली होती. पण, सकाळपासून पाऊस थांबला तरी वीजा कडाडणं सुरूच होतं. वातावरण अंधारलेलं होतं. मैदानात आधीच्या पावसामुळे तळ साचलेलं होतं. त्यातच दहा वाजल्यापासून पाऊसही पुन्हा सुरू झाला. त्यामुळे भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता सामना रद्द करण्यात आला. (T20 World Cup 2024)

 सामना झाला नसला तरी अमेरिकन ड्रेसिंग (American teams) रुममध्ये तो रद्द झाल्यावर जल्लोष सुरू झाला. कारण, आपल्या पहिल्याच टी-२० विश्वचषकात संघाने सुपर ८ गाठली आहे. पाकिस्तान (Pakistan team) सारख्या कसोटी दर्जा असलेल्या संघाला त्यांनी सुपर ओव्हरमध्ये हरवलं. भारतालाही तगडी लढत दिली. सुपर ८ मधील प्रवेशाबरोबरच अमेरिकन संघाने टी-२० विश्वचषक २०२६ साठीही थेट प्रवेश मिळवला आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Rajnath Singh यांनी पूर्व किनारपट्टीवरील नौदलाच्या परिचालन सज्जतेचा घेतला आढावा)

दुसरीकडे पाकिस्तान संघाचं आव्हान मात्र साखळीतच संपुष्टात आलं. भारत आणि अमेरिकाकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानची विश्वचषक मोहीम रुळावरून घसरली होती. आता त्यांचा आयर्लंड विरुद्धचा शेवटचा साखळी सामना औपचारिकता उरला आहे. पावसामुळे तो होईल याचीही शाश्वती नाहीए. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.