ISRO: ‘चांद्रयान-१’ मोहिमेचे डायरेक्टर श्रीनिवास हेगडे यांचे निधन, अंतराळ मोहिमांमध्ये बजावलेल्या सक्रिय भूमिका कोणत्या ? वाचा सविस्तर

माजी शास्त्रज्ञ आणि URSC संचालक डॉ. एम अन्नादुराई यांनी श्रीनिवासूर हेगडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

179
ISRO: 'चांद्रयान-१' मोहिमेचे डायरेक्टर श्रीनिवास हेगडे यांचे निधन, अंतराळ मोहिमांमध्ये बजावलेल्या सक्रिय भूमिका कोणत्या ? वाचा सविस्तर

भारताच्या पहिल्या चंद्र मिशन ‘चांद्रयान १’ मोहिमेचे डायरेक्टर श्रीनिवास हेगडे यांचे शुक्रवारी, (१४ जून) रोजी बंगळुरू येथे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ३ दशकांहून अधिक काळ (१९७८ ते २०१४) त्यांनी भारतीय अंतराळ संस्था (ISRO) सोबत काम केले होते. (ISRO)

मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्याच काळापासून हेगडे यांच्यावर किडनीच्या आजारावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना जयनगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारताच्या विज्ञान जगताचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीनिवास हेगडे यांनी १९७८ ते २०१४ पर्यंत इस्रोमध्ये काम केले आहे. याशिवाय, यूआर राव सॅटेलाइट सेंटर (URSC)चे सदस्य असताना त्यांनी अनेक अंतराळ मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली.

(हेही वाचा – Rain Update: मुंबई, पुण्यासह कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या )

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माजी शास्त्रज्ञ आणि URSC संचालक डॉ. एम अन्नादुराई यांनी श्रीनिवासूर हेगडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, १९८२ मध्ये जेव्हा ते इस्रोमध्ये रुजू झाले तेव्हा हेगडे त्यांचे बॉस होते, त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये मोठी मदत केल्याचे सांगितले.

चांद्रयान मोहीम १ मुळे प्रसिद्धिच्या झोतात…
चांद्रयान मिशन १ मुळे श्रीनिवास हेगडे प्रसिद्धीच्या झोतात आले. या मोहिमेद्वारे भारताने चंद्रावरील पाण्याचा शोध लावला होता. यानंतर ‘चांद्रयान-२’ आणि ‘चांद्रयान -३’ देखील प्रक्षेपित करण्यात आले. ‘चांद्रयान ३’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला होता. सेवानिवृत्तीनंतरही हेगडे बऱ्यापैकी सक्रिय होते. त्यांनी बंगळुरूमध्ये एका स्टार्ट अपमध्ये काम केले. ते आयुष्यभर प्रयोग करत राहिले. त्यांच्या कल्पना नेहमी विज्ञानाला पुढे नेण्याच्या होत्या. याच कारणामुळे आयुष्याच्या शेवटच्या दिवसातही त्यांचे विज्ञानावरील प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.