अग्निवीरांची पहिली बॅच बाहेर पडण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. ही बॅच बाहेर पडण्यापूर्वीच मोदी सरकारकडून या योजनेत बदल करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणण्यात आली होती. या योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. २७ मे २०२४ रोजी बिहारमधील बख्तियारपूर येथे एका निवडणूक रॅलीत काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सत्तेत आलो तर अग्निवीर योजना संपवू. २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधींनी प्रत्येक रॅलीत अग्निवीरचा मुद्दा उपस्थित केला, मात्र आता अग्निपथ योजनेत केंद्र सरकारकडून काही बदल किंवा फेरविचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Agnipath Scheme)
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल १० मंत्रालयाच्या सचिवांना या योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सचिव आपला अहवाल येत्या १८ जूनला केंद्र सरकारकडे सादर करतील. (Agnipath Scheme)
(हेही वाचा – ‘भावी केंद्रीय मंत्री’ म्हणत Sunetra Pawar यांचे बारामतीमध्ये बॅनर!)
कोणते बदल होणार?
– अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या प्रशिक्षणाचा कालावधी ४ वर्षांचा आहे. तो ७ वर्षांचा केला जाण्याची शक्यता आहे. त्यासह अधिकची भरती करणे, २५ टक्के अग्निवीरांना कायम ठेवण्याची मर्यादा वाढवून ७० टक्के केले जाऊ शकते.
– याशिवाय प्रशिक्षणादरम्यान किंवा कर्तव्यावर असताना अग्निवीर जवानाचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही चर्चा सुरू आहे.
नियमित लष्करी जवान आणि अग्निवीरांना दिलेल्या रजेतील फरकातसुद्धा बदल होण्याची शक्यता आहे. अग्निवीरांची पहिली बॅच बाहेर पडण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. ही बॅच बाहेर पडण्यापूर्वीच सरकारला बदल करावे लागणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community