औषधांच्या किंमती कमी (Medicine Prices) करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. औषधांवर अनेक पैसे खर्च करणाऱ्या रूग्णांसाठी सरकारने हा निर्णय घेतला असून एकूण 54 गरजेच्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. ज्या औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Medicine Prices)
NPPA च्या बैठकीत घेतला निर्णय
नुकतंच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी म्हणजेच एनपीपीएची बैठक झाली. एनपीपीएची (NPPA) ही 124 वी बैठक होती. या बैठकीत औषधांच्या किंमतीबाबत हा निर्णय घेण्यात आला. एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या (Essential Medicine) किमती ठरवते. या औषधांचा वापर देशातील सामन्य लोक करतात. बैठकीत 54 औषधी फॉर्म्युलेशन आणि 8 विशेष औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Medicine Prices)
या औषधांच्या किमती घटवल्या
एनपीपीएच्या 124 व्या बैठकीमध्ये 54 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मधुमेह, हृदय, एंटीबायोटीक्स, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाशी संबंधित औषधे इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त NPPA ने या बैठकीत 8 विशेष औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Medicine Prices)
10 कोटींपेक्षा अधिक लोकांना लाभ
एनपीपीएच्या या निर्णयाचा फायदा देशातील 10 कोटींपेक्षा अधिक लोकांना फायदा होणार आहे. सध्या एकट्या देशात 10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. हे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांना नियमित औषधांवर अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत 10 कोटींहून अधिक मधुमेही रुग्णांना कमी झालेल्या किंमतीचा थेट फायदा होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community