- ऋजुता लुकतुके
महिंद्राची थार लाईन (Mahindra Thar 5-Door) अप ही त्यांच्या ब्रँडची ओळख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लांब पल्ल्याचा प्रवास आणि डोंगर-दऱ्या तसंच जंगल सफारीचा प्रवास अशा कुठल्याही मोहिमेसाठी भारतीयांना महिंद्रा थारच डोळ्यासमोर येते. आधी ३ डोअर असलेली ही गाडी आता ५ डोअर (Mahindra Thar 5-Door) म्हणजे जास्त प्रवाशांना सामावून घेणारी होणार आहे. पण, गाडीतील इतर गोष्टी म्हणजे इंजिन, तंत्रज्जान या तशाच आहेत. (Mahindra Thar 5-Door)
५ डोअर (Mahindra Thar 5-Door) झाल्यामुळे ही गाडी आता कुटुंबाची गाडी म्हणूनही पुढे येईल असा विश्वास कंपनीला वाटतोय. त्यामुळे गाडीत झालेले बदलही ४ जणांच्या कुटुंबाला आवडतील असे आहेत. गाडीत बसताना आणि उतरताना प्रवाशांची सोय पाहिली गेली आहे. आणि प्रवासाचा अनुभव आणखी चांगला करण्याचा प्रयत्न आहे. (Mahindra Thar 5-Door)
या गाडीचं छत आणि दरवाजे आधीच्या थार प्रमाणेच काढून टाकता येतात. व्हीलबेस मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने वाढवण्यात आला आहे. अलीकडेच महिंद्रा थारचं टेस्टिंग सुरू असताना ही कार सोशल मीडियावर पहिल्यांदा व्हायरल झाली होती. तो व्हीडिओ पाहूया, (Mahindra Thar 5-Door)
🚨 Mahindra Thar 5-Door spotted testing in Vizag pic.twitter.com/OsZj5cOoLH
— Vizagforyouu 🌊 (@VizagBlogger) June 11, 2024
पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांमध्ये गाडी उपलब्ध आहे. शिवाय गाडीतील आतली जागाही अधिक प्रशस्त झाली आहे. पाय मोकळे सोडता येतील. कसंच गाडीची उंचीही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे गाडीतील प्रवास आता जास्त आरामदायी होणार आहे. (Mahindra Thar 5-Door)
(हेही वाचा- कोल्हापुरात मोठी दुर्घटना; Koyna Express ने तीन महिलांना चिरडले!)
शिवाय गाडीतील स्टोरेज म्हणजे सामन ठेवण्याची जागा कमी झालेली नाही. जंगलात वापरायचे ४ तंबूही यात आरामात मावू शकतात इतकी जागा गाडीत आहे. लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवीन थारमध्ये इन्फोटेनमेंट प्रणाली, मनोरंजनाची इतर साधनंही अद्ययावत करण्यात आली आहेत. या गाडीची किंमत १५ लाखांपासून सुरू होईल. (Mahindra Thar 5-Door)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community