बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीपूर्वी करण्यात येणाऱ्या पशुंच्या आरोग्य पडताळणीचे शुल्क २०० वरून २० रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी हिंदूंच्या देवस्थानांची भूमी बळकावणाऱ्या वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी महायुती सरकारने १० कोटी रुपये अर्थसाहाय्य घोषित केले. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच पशुंच्या कुर्बानीवर सवलत देऊन मुसलमानांना खूश करणारा आणखी एक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. (Waqf Board)
बकरी ईदनिमित्त कुर्बानी द्यावयाच्या पशूच्या हत्येपूर्वीच्या आरोग्य पडताळणीसाठी देवनार पशूवधगृहात घेण्यात येणारे २०० रुपये शुल्क २० रुपये करावे, यासाठी ‘अल्-कुरेशी ह्युमन वेल्फेअर असोशिएशन’ने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. बकरी ईदनिमित्त १७ ते १९ जून या कालावधीत शुल्कात कपात करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. यावर न्यायालयाने राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागाकडे हा विषय मांडण्यास सांगितले तसेच याचिकाकर्त्याने वेळेत माहिती दिल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते. राज्य सरकारने याचिकाकर्त्यांची ही मागणी मान्य तर केलीच तसेच याचिकाकर्त्याने ४ दिवसांची सवलत मागितली असताना सरकारने त्यामध्ये आणखी १ दिवस सवलत देऊन १७ ते २० जून या कालावधीत पशुंच्या पडताळणीच्या शुल्कात सवलत दिली आहे. बकरी ईदनिमित्त मुंबईतील देवनार पशूवधगृहामध्ये लाखो पशुंची हत्या केली जाते.
सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या पशूहत्येचा सर्वसामान्यांना त्रास !
बकरी ईदच्या काळात मुंबईमध्ये उघड्यावर तसेच अवैधरित्या होणाऱ्या पशूहत्येच्या विरोधात शहरातील अनेक नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. नागरी वस्त्यांमध्ये होणाऱ्या पशूहत्या आणि त्यामुळे होणारी दुर्गंधी यांविषयी मुंबईमध्ये ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे सरकारने कुर्बानीपूर्व पशुंच्या पडताळणीमध्ये दिलेल्या या सवलतीविषयी मुंबईकरांकडून खेद व्यक्त होण्याची शक्यता आहे. बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत कुर्बानीसाठी ११४ ठिकाणी अनुमती दिली आहे. बकरी ईदपर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community