मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर तशा डॅशिंग! इंग्रजी येत नसले तरी तोडके मोडके का होईना पण कुणाची भीडभाड न बाळगता बिनधास्तपणे इंग्रजीत बोलल्या, त्यांचा व्हिडिओ व्हायरलही झाला. सगळ्यांची हसून पुरे वाट लागली, पण महापौर बोलण्यात मागे हटायला तयार नाहीत. त्यांचा हा बिनधास्तपणा त्यांनी सोशल मीडियातही दाखवला आणि एका नेटकऱ्याचा थेट बापच काढला! त्यानंतर मात्र मुंबईच्या प्रथम नागरिक लागलीच सोशल मीडियात ट्रोल झाल्या आणि महापौर भानावर आल्या. ‘बाप’ काढलेली ट्विटर पोस्ट त्यांनी डिलीट केली. पण तोवर नेटकऱ्यांनी स्क्रिनशॉट काढले होते, त्यामुळे व्हायचे तेच झाले. महापौर पेडणेकर ट्रोल झाल्याच!
कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले?
म्हा पौर बाई be like
>>>
😂😂😂🙊🙊🙊🙊🙊#तुझ्या_बापाला pic.twitter.com/IHAtK7uKe0— अभिजित भाईप – ABHIJEET BHAIP (@ABHIJEETBHAIP) June 2, 2021
(हेही वाचा : गुरुवारी महापालिका व शासकीय केंद्रांतील लसीकरण बंद)
काय होते प्रकरण?
त्याचे असं झालं कि, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका खासगी वृत्त वहिनीला मुलाखल दिली. सोशल मीडियात प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी ती मुलाखत ट्विटरवर टाकली. त्यात महापौरांनी मुंबईतील १ कोटी लसीकरणाचा मुद्दा मांडला होता. यासाठी महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले असून ९ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे, असे महापौर म्हणाल्या. ही मुलाखत पाहून एका पठ्ठ्याने थेट कमेंट केली, म्हणाला ‘कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिला?’ झालं! महापौरांना जणू हा प्रश्न वर्मी लागला. महापौरांचा तोल गेला, पदाचा विसर पडला, रागाच्या भरात रिप्लाय दिला ‘तुझ्या बापाला’! तेवढ्यात नेटकऱ्यांनी धडाधड स्क्रिनशॉट काढले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना वापरलेल्या शब्दांमुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. अखेर, त्यांना उपरती आली. त्यांनी त्यांचे हे ट्विट डीलिट केलं. मात्र, त्याला उशीर झाला होता. तोवर महापौरांना सोशल मीडियामधून चांगलेच ट्रोल केले जावू लागले होते.
Join Our WhatsApp CommunityThe lady in below tweet is Mumbai Mayor @KishoriPednekar
When asked who got the Vaccination Contract in @mybmc
She answers "तुम्हारे बाप को "
This is an insult to all #Mumbaikars waiting for Vaccination #ShivSenaInsultsMumbaikars pic.twitter.com/nif3GztZi7
— Devang Dave (@DevangVDave) June 2, 2021