EPFO Withdrawal: करोना काळात सुरू केलेली ‘ही’ महत्त्वाची सुविधा बंद, कारण काय ? जाणून घ्या

181
EPFO New Rule : पीएफमधून आता १ लाख रुपये त्वरित काढता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओने करोना काळात सुरू केलेली कोविड ॲडव्हान्स सुविधा बंद केली आहे. करोना काळात खातेदारांना पीएफ अकाउंटमधून आगाऊ (ॲडव्हान्स) पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती, तर आता करोनामुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नसल्यामुळे ही सुविधा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (EPFO Withdrawal)

पीएफ सदस्यांसाठी महत्त्वाची सुविधा बंद
करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान EPF सदस्यांना (EPFO Withdrawal) नॉन-रिफंडेबल ॲडव्हान्सची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर संसर्गाची दुसरी लाट लक्षात घेता ३१ मे २०२१ पासून आणखी एक आगाऊ रक्कम करण्याची परवानगीदेखील देण्यात आली होती, तर आता ईपीएफओने १२ जून २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात ही सुविधा बंद करण्याची घोषणा केली. ईपीएफओने म्हटले की, कोविड-१९ आता आणीबाणी आरोग्य समस्या राहिली नसल्यामुळे आगाऊ सुविधा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्थितीत आता पेन्शन संघटनेचा (Pension Organization) नवीन नियम सूट दिलेल्या ट्रस्टनाही लागू होईल.

(हेही वाचा – Agnipath Scheme: मंत्रालयाच्या सचिवांना ‘अग्निपथ योजने’चा अभ्यास करण्याचे आदेश, मोदी सरकार काय बदल करणार? जाणून घ्या )

ईपीएफओच्या मसुदा वार्षिक अहवालानुसार,
करोना काळात दोन कोटींहून अधिक सदस्यांनी अ‍ॅडव्हान्स (आगाऊ) पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ घेतला. २०२३ पर्यंत करोना अ‍ॅडवॉन्स म्हणून ४८,०७५.७५ कोटी रुपये काढण्यात आले, तर ईपीएफओच्या (EPFO) मसुदा वार्षिक अहवाल २०२३-२३ नुसार पेन्शन संघटनेने २०२०-२१ मध्ये ६९.२ लाख ग्राहकांना १७,१०६.१७ कोटी रुपये वितरित केले. त्याचवेळी, २०२१-२२ मध्ये ९१.६ लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि १९,१२६.२९ लाख कोटी रुपये आगाऊ काढले तर २०२२-२३ मध्ये ६३ लाख सदस्यांनी पीएफ खात्यातून ११,८४३.२३ कोटी रुपये काढले.

पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम काय?
दरम्यान, पीएफ खात्यातून मुदतपूर्वीची पैसे काढण्याची सुविधा असून घरासाठी जमीन खरेदी, घर दुरुस्त, गृहकर्जाचे हप्ते भरणे, कुटुंबातील सदस्य किंवा स्वतःचे लग्न, मुलांचे शिक्षण, नोकरी गमावणे आणि स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याचे उपचार अशा काही कारणांसाठी पीएफ खात्यातून पैसे मुदतीपूर्वी काढले जाऊ शकतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.