Government of Kenya : केनिया सरकारचा धक्कादायक निर्णय; १० लाख भारतीय वंशाच्या कावळ्यांना मारण्याची योजना आखली? वाचा सविस्तर…

506
Government of Kenya : केनिया सरकारचा धक्कादायक निर्णय; १० लाख भारतीय वंशाच्या कावळ्यांना मारण्याची योजना आखली? वाचा सविस्तर...

प्राणी आणि पक्ष्यांवर दया करा, असे आपल्याकडे म्हटले जाते. त्यानुसार, मुक्या प्राण्यांचे आरोग्य आणि आहार-विहाराबाबत पक्षी-प्राणीप्रेमी काळजी घेतात. काही संस्थाही यासाठी कार्यरत असतात, मात्र एका देशात चक्क कावळ्यांची संख्या वाढली म्हणून घेतलेला निर्णय अतिशय धक्कादायक आहे. (Government of Kenya)

कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे हैराण झालेल्या केनिया सरकारने या वर्षअखेरपर्यंत तब्बल १० लाख कावळ्यांची कत्तल करण्याचे फर्मान सोडले आहे. भारतीय वंशाचे हे कावळे १९४० मध्ये आफ्रिकेत आले, तेव्हापासून या कावळ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील कावळे आक्रमक झाले असून त्यांनी इतर पक्षी आणि नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे केनियातील पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीजचे मोठे नुकसान होत असल्याचे केनिया सरकारचे म्हणणे आहे तसेच पुढील ६ महिन्यात म्हणजे २०२४च्या अखेरीस १० लाख कावळ्यांना नष्ट करण्याची योजना येथे आखण्यात आली आहे. . (Government of Kenya)

(हेही वाचा – Mahalakshmi Temple Mumbai : मुंबईतील महालक्ष्मी मंदिराचा रंजक इतिहास! देवीने स्वतःच प्रकट होऊन दिला आशीर्वाद)

केनियातील पक्षीतज्ञ कॉलिन जॅक्सन यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय वंशाच्या कावळ्यांमुळे केनियातील इतर पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे कावळे किनारपट्टीवरील इतर लहान पक्ष्यांना त्रास देतात, इतर पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करतात. यासोबतच ते इतर पक्ष्यांची अंडी आणि पिले खात आहेत. कमी होणाऱ्या इतर पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून किटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत.

रोचा केनिया येथील संरक्षणतज्ज्ञ आणि पक्षी तज्ज्ञ कॉलिन जॅक्सन यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय प्रजातींनी केनियाच्या किनाऱ्यावरील लहान देशी पक्ष्यांची घरटे नष्ट केली आहेत तसेच इतर पक्ष्यांची अंडी आणि त्यांच्या पिल्लांचीही शिकार केली आहे. जेव्हा इतर स्थानिक पक्ष्यांची संख्या कमी होते, तेव्हा पर्यावरण बिघडू लागते. किटकांची वाढ होऊ लागते. यामुळे परिसंस्थेवर परिणाम होतो.

कावळ्यांमुळे अर्थव्यवस्था ढासळली
कावळ्यांची वाढती संख्या केनियातील पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीसाठी त्रासदायक ठरतेय. समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या हॉटेलमध्ये कावळे पर्यटकांना अधिक त्रास देतात. पर्यटकांना खाद्यपदार्थ खात असतानाही ते त्रास देतात. त्यामुळे येथील पर्यटन कमी होत चालले असून केनियाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे केनिया सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कावळ्यांची कत्तल करण्याचा निर्णय केनिया सरकारने घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.