उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची (Badrinath Accident) घटना घडली आहे. या मार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडले. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Badrinath Accident)
(हेही वाचा –Melody: पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांचा VIDEO तुफान व्हायरल, एका तासात मिलियनवर व्ह्यूज!)
रुद्रप्रयाग शहरापासून 5 किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोली जवळ ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेली बस बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Badrinath Accident)
(हेही वाचा –Chhattisgarh News: अबुझमदमध्ये चकमकीत ८ नक्षलवादी ठार, एका जवानाचा मृत्यू तर २ जवान जखमी!)
दरम्यान, बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी बससह अपघातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 5 जण जखमीआहेत. अद्याप मदतकार्य सुरू आहे. (Badrinath Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community