लोकसभेच्या सभापती पदासाठी आता २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएमधील अनेक पक्षांचे या पदाकडे लक्ष असून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र अशातच संयुक्त जनता दलाने भाजपाला (BJP) दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. भाजपाने (BJP) या पदासाठी कोणालाही उमेदवारी दिली तरी आमचा त्यांना पाठिंचा असेल असे जनता दलाचे नेते के. सी. त्यागी (K. C. Tyagi) यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या विधानामुळे हे पद आता तेलगू देसम पक्षाकडे न जाता भाजपाकडेच (BJP) राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगोदर अशा बातम्या येत होत्या की सभापती पदासाठी संयुक्त जनता दल आणि तेलगु देसम पार्टी हे दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. मात्र त्या पदावरचा दावा सोडण्याची भाजपची (BJP) तयारी नाही. त्यात आता जनता दलाने पाठिंबा जाहीर केल्यामुळे भाजपाचे निम्मे टेन्शन कमी झाले आहे. (BJP)
(हेही वाचा – Nitish Kumar यांची प्रकृती बिघडली, पाटणातील मेंदाता रुग्णालयात दाखल)
कोण असेल भाजपाचा उमेदवार?
जर भारतीय जनता पार्टीकडूनच (BJP) सभापती पदाचा उमेदवार दिला गेला तर तीन नावे चर्चेत आहेत. यातील पहिले नाव पक्षाचे सात टर्म खासदार राहीलेले नेते राधा मोहन सिंह (Radha Mohan Singh) यांचे आहे. मागील लोकसभा सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांचेही नाव चर्चेत आहे. बिर्ला यांचीही दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविण्याची तयारी असल्याचे समजते. तिसरे नाव अचानक चर्चेत आले आहे ते आंध्र प्रदेशातील भाजपा नेत्या डी. पुरंदेश्वरी (D. Purandeshwari) यांचे. त्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाही आहेत आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या नातलग असल्यामुळे त्यांच्या नावाला नायडूंचा आक्षेप नसेल असा दावा केला जातो आहे. २०१४ ते २०१९ या काळात भाजपाच्या सुमित्रा महाजन सभापती होत्या. २०१९ ते २०२४ या काळात भाजपचेच ओम बिर्ला यांनी हे पद भूषवले. मात्र या दोन्ही वेळी भाजपला स्वतःला स्पष्ट बहुमत असल्यामुळे कोणती अडचण झाली नाही. (BJP)
हेही पाहा-
Join Our WhatsApp Community