Sanjay Nirupam: मातोश्री – २ फॅक्टरीचे मालक उद्धव ठाकरे, तर संजय राऊत…, संजय निरुपम यांची जहाल टीका

ही फॅक्टरी मातोश्री २ मध्ये आहे, जो मुळातच एक घोटाळा आहे.

218
Sanjay Nirupam: मातोश्री - २ फॅक्टरीचे मालक उद्धव ठाकरे, तर संजय राऊत..., संजय निरुपम यांची जहाल टीका

मातोश्रीमध्ये लबाडीचा कारखाना असून, या कारखान्याचे मालक उद्धव ठाकरे आहेत, तर त्यांचे कारकून म्हणून संजय राऊत कार्यरत आहेत, अशी तिखट टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शनिवारी केली आहे.

संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला होता. तेव्हापासून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यांनी शनिवारी एका ‘X’ पोस्टद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मातोश्रीमध्ये एक लबाडीचा कारखाना आहे. मातोश्री 1 मध्ये नाही. ते पवित्र आहे. कारण, तिथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे राहत होते.

(हेही वाचा – BJP ;संयुक्त जनता दलाचा भाजपाला दिलासा देणारा निर्णय )

मातोश्री – २ मुळातच घोटाळा
ही फॅक्टरी मातोश्री २ मध्ये आहे, जो मुळातच एक घोटाळा आहे. त्यावर पुन्हा त्या कारखान्याचे मालक उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांचे एक कारकून संजय राऊत आहेत. या कारखान्यातून रोज खोटारडेपणाचे एक उत्पादन बाहेर निघते. कारकून ते पसरवण्याचे काम करतो. कधी सामनाच्या माध्यमातून, तर कधी टीव्ही मीडियाच्या माध्यमातून, असे संजय निरुपम म्हणाले.

जनतेत खोटे पसरवण्याचा प्रयत्न
उबाठाने दादर येथे होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाविषयी नवे खोटे पसरवले आहे. कारकुनाने सामनात लिहिले आहे की, या स्मारकाचे बांधकाम बंद पडले आहे. हे साफखोटे आहे. प्रत्यक्षात स्मारकाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. खरे तर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास वेळ लागणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. त्याचे नाव असेल, Statue of equality. एक चांगले व ऐतिहासिक काम केले जात आहे. त्यावर आनंद व्यक्त करण्याऐवजी उबाठा जनतेत खोटे पसरवत आहे. असेही संजय निरुपम यांनी आपल्या एक्स पोस्ट अर्थात ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले होता ठाकरे गट?
उल्लेखनीय बाब म्हणजे, शिवसेनेच्या ठाकरे गटाने शुक्रवारी, इंदू मिलमध्ये होणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मारकाचे बांधकाम ठप्प झाल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, कंत्राटदारावर अंकुश नसल्याचे या स्मारकाचे काम ठप्प पडले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शुक्रवारी एका ट्विटद्वारे हा मुद्दा उजेडात आणला. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकाबाबत मिंधे-भाजपा सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत असून गेले वर्षभर ह्या स्मारकाचे काम रखडले आहे.

बाबासाहेबांच्या विचारांचे प्रेरणादायी जागतिक दर्जाचे स्मारक दादरमधील इंदूमिल कपाऊंड येथे उभारण्यात येत आहे. २०१८ साली स्मारकाला मंजुरी मिळाली आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. कराराप्रमाणे कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. अगदी कोरोनासारख्या कठीण काळातदेखील ह्या स्मारकाच्या कामात खंड पडू दिला नव्हता. मात्र गेले वर्षभर स्मारकाच्या कामाचा आढवा देणारी बैठकच घेतली नाही. यामुळे कंत्राटदारावर अंकुशच राहिलेला नाही आणि स्मारकाचे काम ठप्प झालेले आहे, असे ठाकरे गटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.