पुणेकरांनो सावधान! फेक कॉल्सवर विश्वास ठेवू नका; MNGL चे आवाहन

250
No Spam on Mobiles ? मोबाईल फोनवरील स्पॅम खरंच बंद होणार?

एमएनजीएलने (MNGL) आपल्या ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे बिले भरण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कोणतीही सुविधा प्रदान केलेली नाही. त्यामुळे अशा बनावट किंवा फसव्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एमएनजीएलच्या बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी पुन्हा केले आहे. एमएनजीएलकडे फेक कॉल्स आणि मेसेजसंदर्भात पुन्हा तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना फोन करुन अथवा मेसेजद्वारे ‘मोबाईल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरा. अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल,’ किंवा तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट न केल्यामुळे आज रात्री MNGL गॅस कनेक्शन खंडित केले जाईल” असे सांगितले जात आहे. यातून एमएनजीलची प्रतिमा मलिन होत आहे. यातून एमएनजीलची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे एमएनजीएलच्या व्यवस्थापनाने सदर बाबीची दखल अतिशय गांभीर्याने घेतली आहे. तसेच, एमएनजीएलने ग्राहकांनाही सूचित केले आहे. (MNGL)

सध्या विविध सेवा संस्थांबाबत अशा सायबर फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी सतर्क राहावे आणि अशा फसव्या कृत्यांना बळी पडू नये. असे आवाहन एमएनजीएलने केले आहे. तसेच यासंदर्भात एमएनजीएलने (MNGL) पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील दाखल केली आहे.त्यासोबतच, ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी आपली वेबसाईट आणि अधिकृत सोशल मीडिया हँडल एक्स (पूर्वीचे ट्विटर), Instagram आणि फेसबुक याद्वारे ग्राहकांना सूचित व सतर्क केले आहे. त्यासोबतच विविध वृत्तपत्रांमधून (मराठी , हिंदी इंग्रजी), जाहीर नोटीस देऊन, रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातून आणि ग्राहकांना एसएमएस तसेच व्हॉट्सअँपद्वारे (मराठी, हिंदी इंग्रजी), संदेश पाठवून जनजागृती करत आहे. तसेच एमएनजीएल PNG पुरवठा खंडित करण्याचा कोणताही संदेश पाठवत नाही, असे स्पष्ट करत आहे तसेच, असे प्रकार कोणत्याही ग्राहकासोबत घडत असल्यास, त्यांनी सदर बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली आहे. (MNGL)

(हेही वाचा – BMC : शाळेच्या पहिल्या दिवशी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत)

यासंदर्भात एमएनजीएलजे (MNGL) बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी सांगितले आहे की, “एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी तोतयागिरी करुन एमएनजीएलच्या नावाने फसवे कॉल्स करणाऱ्या आणि गॅस बिल भरण्यासाठी काही ॲप्स डाऊनलोड करण्यास किंवा लिंकद्वारे विचारणा करणाऱ्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे. MNGL फक्त इनव्हॉइस/बिलावर नमूद केलेल्या पेमेंट मोडद्वारे पेमेंट स्वीकारते. https://www.mngl.in/pay-bill, भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS), NACH, ECS, Axis/ICICI बँकेच्या शाखांमध्ये चेक डिपॉझिट आणि पुण्यातील शिवाजीनगर आणि चिंचवडमधील एमएनजीएल वॉक-इन सेंटर्समध्ये बिलाची रक्कम स्विकारली जाते. त्यामुळे अशा तोतयागिरीपासून ग्राहकांनी सावध राहावे.” (MNGL)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.