- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा (Indian team) अमेरिकेतील टप्पा आता संपला आहे. ए गटातून भारत आणि अमेरिका या संघांनी सुपर ८ गाठलेली आहे. त्यामुळे इतर गटवार साखळी सामने औपचारिक असणार आहे. भारताला फटका बसणार आहे तो सरावाच्या अभावाचा. न्यूयॉर्क सोडल्यानंतर पुढचे चार दिवस भारतीय संघाला सरावाची संधीही मिळालेली नाही. मियामी परिसराला वादळी पावसाचा फटका बसला आहे. (T20 World Cup, Ind vs Can)
त्यातच आता भारतीय संघातील (Indian team) २ राखीव खेळाडू लाऊडरहिलमधूनच भारतात परतणार असल्याची बातमी आली आहे. संघातील नियमित खेळाडूंना कुठली दुखापत झाली तर ४ खेळाडूंची फळी भारताने अमेरिकेत पाठवली होती. पण, हा टप्पा भारतासाठी आता निर्विघ्न पार पडला आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि आवेश खान हे राखीव खेळाडू फ्लोरिडामधूनच मायदेशी परतणार आहेत. तर रिंकू सिंग आणि खलिल अहमद संघाबरोबर बार्बाडोसला जातील. (T20 World Cup, Ind vs Can)
(हेही वाचा – छगन भुजबळ नाराज आहेत का? काय म्हणतात Shambhuraj Desai…)
तर पावसाचा अंदाज घेऊन भारतीय संघही (Indian team) रविवारच्या सामन्यानंतर अमेरिकेतून सुपर ८ साठी वेस्ट इंडिजला जाईल. कारण, फ्लोरिडामध्ये सध्या विमान वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सुपर ८ मध्ये भारताचे सामने २० जूनपासून सुरू होणार आहेत. त्यानंतर २२ आणि २४ जूनला भारताचे इतर दोन सुपर ८ सामने होतील. बार्बाडोस, अँटिग्वा आणि सेंट ल्युसिया या तीन ठिकाणी भारताचे सामने होणार आहेत. (T20 World Cup, Ind vs Can)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community