राज्यातील विधानसभा निवडणूक चार महिन्यावर आली असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना उबाठाला हिंगोलीत मोठा धक्का बसला आहे. उबाठा नेते आणि माजी सहकार राज्यमंत्री तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आज शनिवारी १५ जूनला शिवसेनेत (शिंदे) जाहीर प्रवेश केला. (Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले गेल्याने तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उबाठा गटाची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – छगन भुजबळ नाराज आहेत का? काय म्हणतात Shambhuraj Desai…)
शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community