BMC Secondary Schools मधून शालांत परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना यंदापासून अर्थसहाय्य

1109
BMC Secondary Schools मधून शालांत परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना यंदापासून अर्थसहाय्य
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिका माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवत्तेनुसार सर्व प्रथम १०० विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी, तसेच वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक शिक्षणासह केंद्र आणि राज्य शासनाच्या सरकारी नोकरी पूर्व तयारीकरता आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केल्यानंतर या शैक्षणिक वर्षांपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात आहे. (BMC Secondary Schools)

मुंबई महापालिका माध्यमिक शाळांमधून माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवत्तेनुसार सर्व प्रथम १०० विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक शिक्षणासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सरकारी नोकरी पूर्व तयारीकरता आर्थिक सहाय्य देण्यास फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली असून या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निर्देशानुसार तत्कालिन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती, त्यानंतर आता याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत आहे. (BMC Secondary Schools)

वैदयकीय व व्यावसायिक शिक्षणासाठी पूर्व परीक्षेची तयारी…

बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांमधून माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवत्तेनुसार सर्वप्रथम १०० विदयार्थ्यांना वैद्यकीय व व्यावसायिक शिक्षणासाठी (Entrance Exam) पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त रु. ५०,०००/- पर्यंत खाजगी शिकवणी शुल्क विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कालावधीमध्ये एकाच वेळी आर्थिक सहाय्य म्हणून संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास येणार आहे. (BMC Secondary Schools)

(हेही वाचा – Crime : कत्तलीसाठी मुंबईत आणलेल्या २७ म्हशींची सुटका, दोघांना अटक)

विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी…

मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांमधून माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी, ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क २५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल त्या विद्यार्थ्यांना २५,००० रुपयांपेक्षा व्यतिरिक्त त्या त्या शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क (फक्त शिक्षण शुल्क-TUITION FEE) दिली जाणार आहे. (BMC Secondary Schools)

सरकारी नोकरीसाठी पूर्व परीक्षांची तयारी…

माध्यमिक शालांत परीक्षेत उर्तीण होणाऱ्या गुणवत्तेनुसार सर्वप्रथम १०० विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीकरिता जसे की केंद्र व राज्य शासन पूर्व परीक्षांची तयारी, मुख्य परीक्षेच्या तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त ५०,००० रुपये पर्यंत खाजगी शिकवणीचे शुल्क एकाच वेळी आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येईल. या शिकवणी शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. (BMC Secondary Schools)

पुढील सात वर्षांकरता येणार १४ कोटींचा खर्च

सन २०२४-२५ ते सन २०३०-३१ या सात वर्षांकरता कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये १००ने वाढून ७०० पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे पुढील सात वर्षांकरता या अर्थसहाय्याकरता सुमारे १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या तिन्ही उपक्रमातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पहिल्या वर्षी एकूण खर्च हा १ कोटी २५ लाख रुपये अपेक्षित असून पुढील सात वर्षांमध्ये हा खर्च १४ कोटींवर जाऊन पोहोचणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षांत चालू वर्षांतील तसेच मागील वर्षांतील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या व त्यांनी प्रत्यक्षात प्रवेश घेतलेल्या विद्यालयाचे शैक्षणिक शुल्क विचारात घेऊन आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. (BMC Secondary Schools)

अशाप्रकारे मिळणार अर्थसहाय्य
  • पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी सर्व प्रथम गुणत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी : प्रती वर्षी २५ हजार रुपये
  • व्यावसायिक परिक्षांच्या पुर्व तयारीककरता खासगी शिकवणीकरता : एकाच वेळी ५० हजार रुपये
  • केंद्र आणि राज्य शासनाच्या सरकारी नोकरी पूर्व परीक्षांच्या तयारीकरता : एकच वेळी ५० हजार रुपये (BMC Secondary Schools)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.