पुण्यातील पुरंदर विमानतळ होणार की नाही? नागरी उड्डाण मंत्री Muralidhar Mohol म्हणाले…

670
पुण्यातील पुरंदर विमानतळ होणार की नाही? नागरी उड्डाण मंत्री Muralidhar Mohol म्हणाले…

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ शपथ घेतल्यावर पहिल्यांदा पुण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण राज्यमंत्री (Minister of State for Civil Aviation) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यात आल्यावर त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत (Pune Purandar Airport) एक वक्तव्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा केली गेली आहे. विमानतळासाठी जागा कोणती निश्चित करावी याचीत अदलाबदली झाली. बाकी कोणतीही प्रशासकीय हालचाल पाहायला मिळाली नाही. कागदावर असलेलं विमानतळ प्रत्यक्षात कधी होणार की कामय राजकीय चर्चेचीच उड्डाण भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Muralidhar Mohol)

यंदा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना यंदा डबल लॉटरी लागली. आधी लोकसभेचं तिकिट आणि निवडून आल्यावर केंद्रीय राज्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Muralidhar Mohol)

(हेही वाचा – School Uniform : आता महिला बचत गटांकडून होणार शालेय गणवेश शिलाई)

पुरंदरचे विमानतळ लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. डीजीसीएने पुरंदर विमानतळला मान्यता दिली आहे. लवकरच जागेची पाहणी होणार असल्याची माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शपथ घेतल्यावर पहिल्यांदा मोहोळ पुण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांसह समर्थकांनी मोहोळ यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी त्यांना काय बोलले हे त्यांनी सांगितलं. (Muralidhar Mohol)

(हेही वाचा – Sahitya Akademi 2024: साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर)

मुरलीधर मोहोळ यांना सकाळी जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या पीएचा फोन आला, सांगितल की ११ वाजता पीएम हाऊसला बोलवलं आहे. मला विश्वास बसत नव्हता की खरच आहे की काय? स्वप्नवत होत हे सगळं पीएम हाउसला गेल्यावर वेगळ वाटलं. मोदी म्हणाले की, कैसे हो पुणेकर सहकार आणि सिविल एविएशनची दोन खाती मिळाली. बिग बॉस बरोबर काम करायला मिळणार, पुण्याला एक नंबर करायच आहे. पुणेकरांसाठी खूप काम करायचं असून आता पुणेकरांच्या अपेक्षा आता वाढल्या हे स्वाभाविक असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले. (Muralidhar Mohol)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.