Crime News : पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

234
Crime News : पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
Crime News : पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलने (Police Constable) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime News)

विजय साळुंखे (vijay salunkhe) (३८) असे पोलीस कॉन्स्टेबलचे (Police Constable) नाव आहे. विजय साळुंखे हे धारावी येथील शाहू नगर पोलीस ठाण्यात तैनात होते. अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर (pratiksha nagar) येथे कुटुंबासह राहणारे साळुंखे यांनी ३० मे रोजी वैद्यकीय रजेसाठी अर्ज केला होता. विजय आणि त्यांची पत्नी यांच्यात सतत होणाऱ्या भांडणामुळे पत्नी मुलांसह घर सोडून निघून गेली होती त्यामुळे विजय घरात एकटेच राहत होते. (Crime News)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Can : कॅनडा विरुद्धच्या सामन्यानंतर शुभमन गिल, आवेश खान भारतात परतणार)

मागील काही दिवसांपासून विजय कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे कुटुंबियांना काळजी वाटू लागली होती. शुक्रवारी, १४ जून रोजी विजय साळुंखे (vijay salunkhe) यांचे नातेवाईक काळजीपोटी त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा घराच्या दरवाजाला आतून कडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बाहेर दाराची कडी वाजवली, पण दार उघडले नाही. त्यामुळे नातलगांचा संशय बळावला. त्यांनी वडाळा टीटी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडले. त्यावेळी विजय साळुंखे बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. (Crime News)

वडाळा टीटी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. पोलिसांना मृत विजय साळुंखे (vijay salunkhe) यांच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत त्यांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते, अशी माहिती वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली. (Crime News)

(हेही वाचा- BMC Secondary Schools मधून शालांत परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना यंदापासून अर्थसहाय्य)

वडाळा टीटी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि तपासानंतर आवश्यक असल्यास, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पत्नीविरुद्ध एफआयआर नोंदविला जाईल, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी विजय साळुंखे यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. (Crime News)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.