Central Railwayने दोन महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडुन केला तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल!

157
Central Railwayने दोन महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडुन केला तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल!
Central Railwayने दोन महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडुन केला तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल!

मध्य रेल्वेने (Central Railway) विनातिकीट प्रवाशांमुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान आणि तिकीटधारक प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विनातिकीट प्रवाशांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत एप्रिल – मे दरम्यान ९.०४ लाख प्रकरणांमध्ये ६३.६२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (Central Railway)

(हेही वाचा –Mahindra XUV500 2024 : महिंद्रा एक्सयुव्ही गाडी भारतात करणार पुनरागमन)

मध्य रेल्वेवरील (Central Railway) सुमारे १,८१० लोकल फेऱ्यांमधून दररोज सुमारे ३३ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेवर दररोज ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सुमारे ७८ हजार प्रवासी प्रवास करतात. सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र वातानुकूलित लोकल, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवाशांचा प्रवास वाढल्याने, तिकीटधारक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. (Central Railway)

(हेही वाचा –Thane Mumbra Accident : ठाण्यात विचित्र अपघात! सिमेंट मिक्सर वाहन सोसायटीमध्ये उलटला, एका मुलाचा मृत्यू, ६ जखमी)

वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ‘एसी टास्क फोर्स’ सुरू केली आहे. वातानुकूलित लोकल अथवा प्रथम श्रेणी डब्यांमधील अनियमित प्रवासासंबंधित समस्यांचे निराकरण करणे. त्वरित मदत देणे हा या ‘एसी टास्क फोर्स’चा उद्देश आहे. ज्या प्रकरणांमध्ये तत्काळ मदत करणे शक्य नाही, त्या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्स ॲप क्रमांक उपलब्ध केला आहे. शिवाय वातानुकूलित लोकल अथवा प्रथम श्रेणी डब्यांमधील समस्या सोडविण्यासाठी एक विशेष नियंत्रक पथकही तयार केले आहे. (Central Railway)

एप्रिल ते मे २०२४ या कालावधीसाठी विभागनिहाय दंड वसुली

मुंबई विभागातील ४.०७ लाख प्रकरणांमधून २५.०१ कोटी रुपयांची दंड वसुली
भुसावळ विभागातील १.९३ लाख प्रकरणांमधून १७.०७ कोटी रुपयांची दंड वसुली

नागपूर विभागातील १.१९ लाख प्रकरणांमधून ७.५६ कोटी रुपयांची दंड वसुली
सोलापूर विभागातील ५४.०७ हजार प्रकरणांमधून ३.१० कोटी रुपयांची दंड वसुली

पुणे विभागातील ८३.१० हजार प्रकरणांमधून ६.५६ कोटी रुपयांची दंड वसुली
मुख्यालयामधून ४६.८१ हजार प्रकरणांमधून ४.३० कोटी रुपयांची दंड वसुली

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.