Delhi Metro : मेट्रो ड्रायव्हरचे कॅबिन काढणार, ड्रायव्हरलेस मेट्रो धावणार ?

141
Delhi Metro : मेट्रो ड्रायव्हरचे कॅबिन काढणार, ड्रायव्हरलेस मेट्रो धावणार ?
Delhi Metro : मेट्रो ड्रायव्हरचे कॅबिन काढणार, ड्रायव्हरलेस मेट्रो धावणार ?

दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) सर्वात मोठा बदल केला आहे. या मेट्रोमधून ड्रायव्हरचे कॅबिनच काढण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो आता चालकाविना धावणार आहे. पूर्णपणे स्वंयचलित पद्धतीने मेट्रो धावणार आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही स्वयंचलित मेट्रो धावणार आहे. सध्या ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनमध्ये एक अटँडेंट असणार आहे. (Delhi Metro)

दिल्ली मेट्रोनंतर मुंबई अन् पुणे मेट्रो ड्रायव्हरलेस

मेट्रोत ड्रायव्हरचे कॅबिन काढल्यानंतर ट्रेन पूर्ण स्वयंचलित असणार आहे. यामुळे मेट्रोच्या ट्रेनमधील प्रवाशांसाठी जास्त जागा उपलब्ध होतील. मेट्रोमध्ये ड्रायव्हरचे कॅबिन मागे अन् पुढे असे दोन्ही बाजूने असते. सध्याच्या लाईनवर धावणारी मेट्रो आणि पिंक लाईनवर धावणारी मेट्रोही ड्रायव्हरलेस असणार आहे. मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे मानवी चुका टळतात. ट्रेनचे संचालन करणे सोपे असते. दिल्ली मेट्रोनंतर हा पर्याय मुंबई अन् पुणे मेट्रोत येणार आहे. (Delhi Metro)

16 मेट्रोमधून ड्रायव्हरची कॅबिन काढली जाणार

दिल्ली मेट्रोचे (Delhi Metro) पूर्ण स्वयंचलित नेटवर्क सध्या 97 किमी लांब आहे. आता या महिन्याच्या शेवटपर्यंत दिल्ली मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित होणार असल्याचे दिल्‍ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. 16 मेट्रोमधून ड्रायव्हरची कॅबिन काढली जाणार आहे. यामुळे प्रवाशांसाठी जास्त जागा मिळणार आहे. तसेच दिल्‍ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ट्रेन अटँडेंट टप्पाटप्याने काढण्यात येणार आहे. तीन, चार ट्रेन मिळून एक अटँडेट ठेवण्यात येणार आहे. (Delhi Metro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.