Masala Tea: घरी सुगंधी मसाला चहा कसा बनवाल? रेसिपी वाचा; योग्य पद्धत जाणून घ्या

169
Masala Tea: घरी सुगंधी मसाला चहा कसा बनवाल? रेसिपी वाचा; योग्य पद्धत जाणून घ्या

सकाळचा पहिला चहा किती महत्त्वाचा असतो, हे चहाप्रेमींना वेगळं सांगायलाच नको ! ग्रीन टी, ब्लू टी, बदाम-पिस्ता चहा, ईराणी चहा, बुरंश चहा, शीर चहा, आसाम चहा, दार्जिलिंग चहा, निलगिरी चहा, उलांग चहा, तुळशीचा चहा…असे ना ना तऱ्हेचे चहाचे प्रकार आजच्या काळात बाजारात उपलब्ध झाले आहेत. तरीही विविध प्रकारचे गरम मसाले वापरून तयार केलेला ‘सुगंधी मसाला चहा’ पिण्याची लज्जत काही न्यारीच असते. या चहाची चव सामान्य आणि इतर सर्व प्रकारच्या चहापेक्षा वेगळी असते. मसाला चहा अनेक चहाप्रेमींच्या आवडीचा असतो शिवाय मित्रमंडळींसोबत या चहाचा आस्वाद घेणे म्हणजे दिवसातला एक आनंदी आणि उत्साही कार्यक्रमच !!

मसाला चहामध्ये (Masala Tea) विविध प्रकारचे गरम मसाले वापरल्यामुळे त्याला एक वेगळा सुगंध येतो. हा चहा आरोग्यदायी असून त्याची चवही उत्तम असते. पावसाळ्याच्या दिवसात तर मसाला चहा प्यायल्यामुळे तरीतरीतपणा येतो. उत्साह वाढून शरीराला ऊब मिळते. घरी चहाचा हा सुगंधी मसाला तयार करण्याची एक स्वतंत्र रेसिपी आहे. यामध्ये कोणत्या मसाल्याचे प्रमाण किती घ्यायचे हे यामध्ये दिलेले असते. हा सुगंधी चहा मसाला घरी कसा बनवायचा, याची सोपी पद्धत जाणून घेऊया –

(हेही वाचा – Veer Savarkar यांनी अनुयायी निर्माण करण्याऐवजी विचारक निर्माण केले – स्वप्नील सावरकर)

लागणारे साहित्य
१/२ कप हिरवी वेलची, ५ काळ्या वेलची, २ चमचे बडीशेप, २ चमचे काळी मिरी, १ चमचे लवंग, तीन इंच दालचिनीचे २ तुकडे, १ छोटा तुकडा कोरडे आले, १ जायफळ, १ चक्र फूल स्टार फूल

चहा मसाला पावडर कशी बनवायची?
सर्वप्रथम कढईत हिरवी वेलची, काळी वेलची, लवंग, बडीशेप, काळी मिरी आणि दालचिनी घालून २-३ मिनिटे कोरडी भाजून घ्या. या दरम्यान गॅसची आच मंद ठेवा. मसाल्यातून सुगंध यायला लागल्यावर गॅस बंद करून मसाला एका भांड्यात बाजूला काढा. नंतर त्याच कढईत कोरडे आले, चक्र फूल (स्टार फुल) आणि जायफळ टाका आणि २-३ मिनिटे कोरडे भाजून घ्या. आता या गोष्टी बाकीच्या मसाल्यांमध्ये मिसळा. नंतर जायफळ फोडून त्याचे दोन-तीन तुकडे करावेत जेणेकरून त्याची बारीक पावडर सहज करता येईल. आता हे सर्व मसाले व्यवस्थित थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्या. हा तयार झालेला सुगंधी चहा मसाला चहाच्या (Masala Tea) प्रमाणाप्रमाणे आवश्यक तेवढाच चहासाठी वापरावा. एका हवाबंद डब्यात साठवून ४ चहा मसाला वापरता येऊ शकतो.

मसाला चहा कसा बनवाल?
परफेक्ट मसाला चहा बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. पाणी उकळायला लागल्यावर त्यात साखर आणि चहाची पाने टाका. चहा एक किंवा दोन मिनिटे उकळवा आणि त्यात दूध मिसळा. दूध घातल्यानंतर चहाला पुन्हा उकळू द्या. नंतर चहा दोन ते तीन मिनिटे उकळल्यानंतर त्यात अर्धा चमचा घरी तयार केलेला चहा मसाला मिसळा आणि चहाला पुन्हा उकळी येऊ द्या. यानंतर गॅस बंद करा आणि एक-दोन मिनिटे चहा झाकून ठेवा. त्यानंतर चहा कपामधून सर्व्ह करा आणि गरम मसाला चहाचा (Masala Tea) आनंद घ्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.