Elon Musk च्या शंकेला भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले, आम्ही शिकवणी घेऊ…

144
Elon Musk च्या शंकेला भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले, आम्ही शिकवणी घेऊ...
Elon Musk च्या शंकेला भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले, आम्ही शिकवणी घेऊ...

ईव्हीएमविषयी एलॉन मस्क (Elon Musk) यांची टिप्पणी ही खूपच वरवरची आणि सामान्य आहे. याचा अर्थ असा होतो की, कुणीच सुरक्षित हार्डवेअर करू शकत नाही का ? मला वाटतं हे साफ चुकीचं आहे. एलॉन मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित खरी ठरत असेल. भारतात ईव्हीएममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. आमच्या यंत्रात ब्लूटूथ, वाय-फाय, इंटरनेट यासारखी कोणतीही कनेक्टिव्हीटीची सुविधा नाही. भारतासारखेच ईव्हीएम इतर लोकही बनवू शकतात. एलॉन मस्कला सांगू इच्छितो की, हवं तर आम्ही त्यांसाठी शिकवणी वर्ग घेऊ शकतो, असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी दिले आहे.

(हेही वाचा – Crime News: ग्राहकाने मागितला गरम समोसा, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके)

भारतात ईव्हीएम यंत्रावर विरोधकांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी (loksabha election 2024) बॅलटपेपरवर निवडणुका घेण्यासाठी याचिकाही करण्यात आली होती. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी टेस्ला आणि स्पेसएक्स यांसारख्या जगविख्यात कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता एलॉन मस्क यांनी वर्तविली आहे. त्यामुळे याचा वापर करू नये, असा सल्लाही एलॉन मस्क यांनी दिला आहे. यानंतर आता भारताताही ईव्हीएम विषयी चर्चा चालू आहेत. भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांना प्रत्युत्तर दिले आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ईव्हीएमबाबत एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टनंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपली शंका उपस्थित केली. अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने ईव्हीएमचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.