मोबाईल ओटीपीचा आणि EVM चा संबंध नाही; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषद घेऊन खुलासा

खासदार रविंद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडीलकरने ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याच्या आरोपांनी गेले २ दिवस राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मंगेश पंडीलकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाचा कर्मचारी दिनेश गुरव याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

210
मोबाईल ओटीपीचा आणि EVM चा संबंध नाही; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषद घेऊन खुलासा
मोबाईल ओटीपीचा आणि EVM चा संबंध नाही; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषद घेऊन खुलासा

ईव्हीएम (EVM) अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही. तसेच ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही. आज आलेल्या बातम्यांवरून काही लोकांनी ट्विट केले आहे. चुकीची बातमी प्रसिद्ध केली आहे. ईव्हीएम ही स्वतंत्र प्रणाली आहे. आम्ही चुकीची बातमी दिल्यावरून वृत्तपत्राला नोटीस पाठविली आहे. आयपीसी 499 अंतर्गत मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मोबाईल ओटीपीचा आणि ईव्हीएमचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी दिले आहे. यावरून निवडणूक आयोगाने १६ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही, असे निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Christian Missionary: पुण्यात हिंदूंवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हा दाखल )

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा मेहुणा मंगेश पंडीलकरने ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याच्या आरोपांनी गेले २ दिवस राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मंगेश पंडीलकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाचा कर्मचारी दिनेश गुरव याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश पंडीलकर हे मतमोजणीच्या खोलीत मोबाईल वापरत असल्याची तक्रार इतर उमेदवारांनी केली होते. त्यानंतर पोलिसांनी ४ जून रोजीच पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला होता. आता पोलीस तपासात पंडीलकर हे ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी हा मोबाईल वापरला गेल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून, ते आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. हे फुटेज पोलीस आता तपासणार आहेत. या फोनमधील नंबरचा सीडीआरही तपासला जात आहे. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांना केवळ ४८ मतांनी विजय मिळाला आहे. या मतमोजणीत आधी उबाठा गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Gajanan Kirtikar) यांना विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर पुन्हा वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, हे समोर आल्याने राजकीय वादळ उठले आहे. पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करताच निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. यावर आयोगाने विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.