Christian Missionary: पुण्यात हिंदूंवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हा दाखल 

589
Christian Missionary: पुण्यात हिंदूंवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हा दाखल 

ख्रिश्चन धर्म (Christian Missionary) स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल असे सांगत घरात घुसत हातामध्ये बायबल ठेवत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या धर्मप्रचारकांनी मूर्तिपूजा करु नका, असे सांगत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विडी कामगार वसाहतीमध्ये घडला. याप्रकरणी प्रेरणा दिलीप भंडारी (वय 25, रा. शनी मंदिराशेजारी, विडी कामगार वसाहत (Vidi Labor Colony), चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांची आई आणि लहान भावासमवेत राहतात. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या एका खासगी कंपनीमध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. (Christian Missionary)

कसा घडला प्रकार?

घरात घुसलेल्यांनी रीना आणि एलिस अशी नावे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील हस्तपत्रक दाखवत आजकाल मुले मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरत आहेत, त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मनावर होत असल्याचे सांगितले. त्यांनी ‘हस्तपत्रकामध्ये ख्रिस्तीधर्माबद्दल माहिती दिलेली असून त्यावरील कोड स्कॅन केल्यास ख्रिस्ती धर्माबद्दल माहिती मिळेल असे सांगितले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या आईला ख्रिस्तीधर्माबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघींनी घरात येऊ का, अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्यांना घराबाहेर थांबूनच माहिती द्या असे सुचवले. त्यांचे काहीही न ऐकता या दोघी घरात घुसल्या. त्यांच्यासोबत असलेल्या रिबेका, शारदा, प्रिया या तिघी बाहेर उभ्या राहिल्या.  (Christian Missionary)

(हेही वाचा – Ram Mandir Ayodhya: सर्वात मोठे धनुष्यबाण आणि गदा बसवणार; वजन किती माहीत आहे का?)

रिना आणि एलिस यांनी ‘ख्रिस्ती धर्म स्विकारला तर, तुमचे आयुष्य चांगले जाईल. तुमच्या सगळ्या व्याधी दूर होतील. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा.’ असे म्हणत फिर्यादीच्या हातामध्ये बायबल ग्रंथ ठेवला. तसेच, ‘मूर्ती पूजा करु नका’ असे त्या म्हणाल्या. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या आईला ख्रिस्ती धर्म स्वीकराण्याबाबत जबरदस्ती केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Elon Musk च्या शंकेला भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले, आम्ही शिकवणी घेऊ…)

या प्रकरणी गुन्हा दाखल 

संबंधित प्रकरणात रीना रामदास मनसा (वय 50, रा. गंगापुरम सोसायटी, दोराबजी मॉलसमोर, विमाननगर), एलिसा रमेश आल्फ्रेड् (वय 70, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी), रिबेका अनुराज सिगामनी (वय 48, रा. बालाजी उद्यमनगर, वडगाव शेरी), शारदा जगदीश सोदे (रा. ओम गंगोत्री सोसायटी, गुरुद्वारा गल्ली, वडगाव शेरी), प्रिया राजू सिंगामनी (वय 45, रा. सुनीतानगर, संकल्प सोसायटी, वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध भादंवि 141, 143, 452, 295-अ, 298 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Christian Missionary) 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.