Rain Update: राज्यात चिंता वाढवणारी बातमी; पावसाने पुन्हा मारली दांडी!

212
Rain Update: राज्यात चिंता वाढवणारी बातमी; पावसाने पुन्हा मारली दांडी!

मुंबईसह राज्यात वेळेआधीच मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र मागील काही दिवसांपसून पावसाने राज्यात दांडी (Low Rain) मारल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. तसेच विदर्भामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह इतर भागात ऊन सावल्यांचा खेळ चांगलाच रंगलेला असून, दुपारी पांढरे ढग आणि निळेशार आकाश असे चित्र दिसत आहे. त्यामुळे ऐन पावसाच्या दिवसात उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Rain Update)

(हेही वाचा – Christian Missionary: पुण्यात हिंदूंवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हा दाखल )

सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसाने काही भागात उघडीप दिली असून, त्या भागात उन्हाचा चांगलाच चटका आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. सध्या खानदेश आणि पूर्व विदर्भात मॉन्सूनची (late Mansoon) वाट पाहिली जात आहे. रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी यलो अलर्ट दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट आहे. (Rain Update)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.