Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालयात ड्रेस कोड लागू; हिजाब घालता येणार नसल्याने विद्यार्थिनी उच्च न्यायालयात

183
Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालयात ड्रेस कोड लागू; हिजाब घालता येणार नसल्याने विद्यार्थिनी उच्च न्यायालयात
Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालयात ड्रेस कोड लागू; हिजाब घालता येणार नसल्याने विद्यार्थिनी उच्च न्यायालयात

चेंबूर ट्रॉम्बे शिक्षण संस्थेच्या (Chembur Trombay Education Society) ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयात ‘ड्रेस कोड’ (dress code) लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये अशी सूचना जारी केली आहे की, कोणताही विद्यार्थी धार्मिक वस्त्रे परिधान करून महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करू शकत नाही. या अधिसूचनेमुळे हिजाब, बुरखा, नकाब परिधान करता येणार नसल्याने मुसलमान विद्यार्थिनींनी थयथयाट करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या नऊ विद्यार्थिनींनी न्यायालयाने महाविद्यालयातील हिजाबवरील बंदी (Hijab Ban) हटवावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे. यात महाविद्यालय व्यवस्थापनासह मुंबई विद्यापीठ (Mumbai University), राज्य आणि केंद्र सरकारलाही याचिकेत प्रतिवादी आहे. यावर १९ जून रोजी सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाकडून निश्चित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – मोबाईल ओटीपीचा आणि EVM चा संबंध नाही; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषद घेऊन खुलासा)

धार्मिक वस्त्रे परिधान करून महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश नाही

आचार्य महाविद्यालयाने गेल्या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेद्वारे महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोडबाबत काही नियम जारी केले होते. महाविद्यालयाने यंदा मे महिन्यात आणखी एक अधिसूचना काढली. यावेळी महाविद्यालयाने ही अधिसूचना द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी काढली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मुसलमान विद्यार्थ्यांनी या अधिसूचनेचा विरोध केला. यापूर्वी कर्नाटकमध्येही शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी (Hijab Ban) घालण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.