Pune Car Accident: मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा; ‘बाल न्याय’ मंडळाच्या ३ सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस

221
Pune Car Accident: मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा; 'बाल न्याय' मंडळाच्या ३ सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन दिल्याचा निर्णय वादग्रस्त ठरल्यानंतर बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी सुरू केली होती. त्याचा अहवाल महिला व बालविकास आयुक्तांना (Commissioner for Women and Child Development) प्राप्त झाला असून, अहवालातील चौकशीत या निर्णयात त्रुटी आढळल्याने मंडळाच्या सर्व तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (Pune Car Accident)

नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यावर महिला व बालविकास आयुक्तांच्या निरीक्षणासह त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाला त्याच दिवशी जामीन देऊन निबंध लिहिणे, वाहतूक नियमनात मदत करणे अशा स्वरुपाची शिक्षा सुनावली होती. बाल न्याय मंडळाच्या (Juvenile Justice Board) सदस्याच्या या निर्णयावर मोठी टीका झाली. पोलिसांनीही त्याला सज्ञान ठरवून खटला चालविण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडे मागितली हाेती. मात्र, उच्च न्यायालयाने पोलिसांना पुन्हा बाल न्याय मंडळाकडेच (Juvenile Justice Board) दाद मागावी, असा निर्णय दिला. (Pune Car Accident)

(हेही वाचा – पराभव जिव्हारी लागल्याने रडीचा डाव, EVM प्रकरणी Ravindra Waikar यांचा पलटवार)

वास्तविक, अशा प्रकरणात निर्णय देताना मंडळाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती आवश्यक असतानाही केवळ एका सदस्याने हा निर्णय दिला. चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर मात्र, मंडळाला निर्णय बदलणे भाग पडले. याची दखल महिला बालविकास आयुक्तालयाने देखील घेतली. त्यानुसार मंडळाच्या निर्णयाची पडताळणी करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समितीची स्थापना केली हाेती. (Pune Car Accident)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.