Pune Porsche Accident : आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला; बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला

Pune Porsche Accident : आरोपीला जामीन मिळावा यासाठी त्याच्या नातेवाईकांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.

168
Pune Porsche Accident : आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला; बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला
Pune Porsche Accident : आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला; बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला

 पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. आरोपीला जामीन मिळावा यासाठी त्याच्या नातेवाईकांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता या मुलाला बाल सुधारगृहामध्येच राहावे लागणार आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाचे आई-वडील हे देखील तुरुंगात आहेत.

(हेही वाचा – Indian Air Force : रेड फ्लॅग हवाई युद्ध सरावात भारतीय हवाई दलाच्या ताफ्याचा यशस्वी सहभाग)

आरोपीच्या काकूने केली याचिका

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या जामीनासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. आरोपी मुलाला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावे, अशी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. आरोपी मुलाच्या काकूने ही याचिका दाखल केली होती. बाल अधिनियम कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आरोपी मुलाच्या नातेवाईकांनी केला होता. पण त्यांनी दाखल केलेली ही याचिका हायकोर्टाने फेटाळली. त्यामुळे आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम आणखी वाढला आहे.

अल्पवयीन आरोपीने चालवली बेदरकार कार

पुण्याच्या कल्याणीनगर भागामध्ये 19 मे रोजी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली होती. आरोपी मुलाने आपल्या आलिशान पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना चिरडले होतो. कार चालवाताना आरोपी मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे मध्य प्रदेशचे होते आणि पुण्यामध्ये ते नोकरी करत होते. दोघेही इंजिनिअर होते. अनिस आणि अश्विनी आपल्या मित्राची बर्थडे पार्टी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणावरून ते दुचाकीवरून येरवड्याच्या दिशेला जात असताना त्यांना पोर्शे कारने जोरदार धडक दिली होती. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. (Pune Porsche Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.