Deep Sea Mission: खोल समुद्रात शोध मोहीम राबवणारा भारत ठरणार जगातील सहावा देश

205
Deep Sea Mission: खोल समुद्रात शोध मोहीम राबवणारा भारत ठरणार जगातील सहावा देश

केंद्रीय भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह (Minister Jitendra Singh) यांनी रविवारी सांगितले की, भारत स्वतःचे खोल समुद्रात मोहीम राबवणारा सहावा देश बनणार आहे. मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन शनिवारी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. खोल समुद्र मोहिमेच्या प्रगतीबद्दल आणि भारत हा पराक्रम गाजवणाऱ्या मोजक्या राष्ट्रांमध्ये असल्याबद्दल अभिमान आणि आनंद मंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. (Deep Sea Mission)

डॉ. जितेंद्र सिंह (Minister Jitendra Singh) यांनी ‘डीप सी’ मिशनच्या प्रगतीबद्दल आणि ही कामगिरी करणाऱ्या मोजक्या देशांपैकी भारत  एक आहे. याबद्दल अभिमान आणि आनंद व्यक्त केला. समुद्रावर आणि त्याच्या उर्जेवर आपल्या उपजीविकेसाठी अवलंबून असलेल्यांना सक्षम करण्यासाठी लवचिक नील-अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यावर संस्थांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.  

(हेही वाचा – Kalina land Case : Chhagan Bhujbal यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश )

‘राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेने (NIOT), मत्स्ययान 6000 विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची केंद्रीय मंत्र्यांनी  प्रशंसा केली. हे यान महासागरात 6000 मीटर खोलवर जाऊ शकते. प्रगतीचा आढावा घेताना, त्यांनी अधिकाऱ्यांना हार्बर ट्रेलचा पहिला टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत आणि त्यानंतरच्या चाचण्या 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. (Deep Sea Mission)

(हेही वाचा – मोबाईल ओटीपीचा आणि EVM चा संबंध नाही; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषद घेऊन खुलासा)

“डीप सी मिशनमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासामध्ये मोठा हातभार लावण्याची क्षमता आहे,” असे डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले. या मोहिमेचा भारतीय सागरी हद्दीतील वनस्पती आणि जीवजंतू, खोल समुद्रातील उत्खनन, महत्वाच्या धातूंचे व्यावसायिक उत्खनन, धातू आणि पॉली मेटॅलिक नोड्यूलचा शोध यावर होणारा परिणाम त्यांनी अधोरेखित केला. (Deep Sea Mission)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.