लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला मोठं यश मिळालं. कोकण पदवीधर निवडणुकीतही पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद असेल, असं प्रतिपादन भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. ठाण्यात साजऱ्या झालेल्या महायुती विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील (Eknath Shinde) उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी फडणवीसांनी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. निरंजन डावखरे हे सर्वाना जिंकणारे उमेदवार आहेत. डावखरेंनी १२ वर्ष प्रतिनिधित्व केलंय. त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न मांडलेत. ते जागरूक आमदार आहेत. जुन्या पेन्शनसाठी समिती तयार केली आणि तोडगा काढला. पेन्शन अणि त्यांचे भत्ते मिळतील, असे काम केलं आहे. २००५ पूर्वीचे शिक्षकांचे प्रश्नदेखील सोडवलेत, असं म्हणत फडवीस यांनी डावखरेंच्या कामांची माहिती दिली.
(हेही वाचा – Nagpur Accident: कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स बस रिक्षावर धडकली, २ जवान हुतात्मा, ६ जण गंभीर जखमी)
या निवडणुकीत चांगले मतदान होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास जरी वर्तवला असेल, तरी मतं मिळवण्यासाठी आपला कस लागणार असल्याचं सांगितलं; कारण ही निवडणूक लोकसभेसारखी प्रचार करणारी नाही, तर नियोजन करणारी आहे. ही निवडणूक नियोजनाची निवडणूक आहे. प्रत्येक मतदाराला भेटून ‘हार्ट तू हार्ट’ मतदान करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक मतदाराला भेटण्याचं आश्वासन…
मतदार आपल्याला गठ्ठ्याने सापडत नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. काही ऑफिस असतात, काही संस्थांमध्ये आढळतात, काही महाविद्यालयात असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल तसेच त्यांना आपण मतदान केंद्रापर्यंत कसं आणायचं या २ गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जो जाहीरनामा तयार केला आहे. तो प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचला पाहिजे. हा जाहीरनामा पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रचार सभा, रॅली, काढायची नाही. ही निवडणूक ‘मॅन टू मॅन’ आणि ‘हर्ट टू हर्ट’ अशा प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. ९८ टक्के मतदार हे ठाणे जिल्ह्यात आहेत, तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या दीड ते २ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यावर मोठी जबाबदारी आहे. येथे जास्तीत जास्त मतदान घडवून आणू तेवढा मोठा आपला विजय होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community