ज्योती प्रसाद अग्रवाला (Jyoti Prasad Agarwal) हे आसाममधील प्रसिद्ध भारतीय नाटककार, गीतकार, कवी, लेखक आणि चित्रपट निर्माते होते. त्यांना आसामी सांस्कृतिक प्रतीक मानले जात होते. १९३५ साली आलेल्या जॉयमोती या चित्रपटासाठी त्यांना आसामी सिनेमाचे संस्थापक मानले जाते. ज्योती प्रसाद अग्रवाला यांचा जन्म १७ जून १९०३ रोजी तामुलबारी टी इस्टेट येथे झाला. प्रसिद्ध आसामी कवी चंद्र कुमार अग्रवाला आणि आनंद चंद्र अग्रवाला हे त्यांचे काका होते. (Jyoti Prasad Agarwal)
त्यांचे शालेय शिक्षण आसाम आणि कलकत्ता येथे झाले. त्यांनी १९२१ मध्ये मॅट्रिक केले. ते १९२६ मध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी एडिनबर्गला गेले, परंतु अभ्यासक्रम पूर्ण करण्यापूर्वी ते १९३० मध्ये परतले. मात्र परत येण्याआधी ते जर्मनीतील यूएफए स्टुडिओमध्ये सात महिने चित्रपट निर्मिती शिकले. (Jyoti Prasad Agarwal)
(हेही वाचा- Kolkata येथील BJP Office बाहेर सापडली बॉम्बसदृश वस्तू; भाजप नेते म्हणतात, हे बंगालमध्येच का ?)
आसाममध्ये पुनरागमानंतर ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले. म्हणून त्यांना १९३२ मध्ये पंधरा महिने तुरुंगवास भोगावा लागला. बाहेर आल्यावर त्यांनी भोलागुरी टी इस्टेट येथे चित्रबन स्टुडिओची स्थापना केली आणि १९३३ च्या शेवटी जॉयमोती चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले. हा आसाममधील पहिला चित्रपट होता. म्हणूनच त्यांना आसामी सिनेमाचे संस्थापक म्हटले जाते. (Jyoti Prasad Agarwal)
१९४१ मध्ये त्यांनी पुन्हा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि १९४२ मध्ये ब्रिटीशांच्या दडपशाहीपासून वाचण्यासाठी ते भूमिगत झाले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक कथा लिहिल्या, कादंबरी, बाल साहित्य, गाणी, चित्रपट, नाटके, कविता लिहिल्या. त्यांना आसामी संस्कृतीचे रुपकंवर म्हटले जाते. १७ जानेवारीला त्यांची पुण्यतिथी असते. हा त्यांचा सन्मान सिल्पी दिवस (कलाकार दिन) म्हणून साजरा केला जातो. (Jyoti Prasad Agarwal)
हेही पहा-