Stock Market: देशभरातील बँकांसह शेअर बाजारालाही सोमवारी सुट्टी; नेमकं कारण काय?

आठवड्यात फक्त चारच दिवस ट्रेडिंग सुरू असेल.

124
Stock Market: देशभरातील बँकांसह शेअर बाजारालाही सोमवारी सुट्टी; नेमकं कारण काय?
Stock Market: देशभरातील बँकांसह शेअर बाजारालाही सोमवारी सुट्टी; नेमकं कारण काय?

देशातील सर्व बँका सोमवारी, (१७ जून) बंद राहणार आहेत तसेच मंगळवारीही काही ठिकाणी बँका बंद असतील. बँकांसोबतच शेअर बाजारही बंद आहे. त्यामुळे या काळात बँका बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंगची सुविधा चालूच राहणार आहे. मोबाईल आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून ग्रहकांना त्यांची कामे करता येणार आहेत. रोख पैसे काढायचे असतील तर एटीएमचाही वापर करता येईल.

शेअर बाजारात (Stock Market) ट्रेडिंग (Trading) करणाऱ्यांना सोमवारी पैसे कमवता येणार नाहीत तसेच शेअरची खरेदी किंवा विक्रीही करता येणार नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार बंद असल्यामुळे आठवड्यात फक्त चारच दिवस ट्रेडिंग सुरू असेल.

(हेही वाचा – Kolkata येथील BJP Office बाहेर सापडली बॉम्बसदृश वस्तू; भाजप नेते म्हणतात, हे बंगालमध्येच का ? )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.