Gautam Gambhir : गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार हे जवळ जवळ निश्चित?

Gautam Gambhir : गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी घातलेल्या अटी बीसीसीआयने मान्य केल्याची बातमी आहे

149
India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?
India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच (Gautam Gambhir) होणार आणि येत्या काही दिवसांतच याची औपचारिक घोषणा होणार असे संकेत आहेत. बीसीसीआयने (BCCI) या विषयी गौतम गंभीर (Gautam Gambhir) बरोबर चर्चा केली आहे. त्याने घातलेल्या एका अटीची पूर्तता करण्याच्या बोलीवर गंभीरने हा प्रस्ताव मान्यही केला आहे. टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ लढतींदरम्यान गंभीरच्या नावाची घोषणा होऊ शकते. विश्वचषकानंतर लगेचच राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपत आहे. (Gautam Gambhir)

(हेही वाचा- Kolkata येथील BJP Office बाहेर सापडली बॉम्बसदृश वस्तू; भाजप नेते म्हणतात, हे बंगालमध्येच का ?)

बांगलादेशच्या भारत दौऱ्यापासून गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाची धुरा हातात घेऊ शकेल. दैनिक भास्करने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. ‘आम्ही याविषयी गौतम गंभीरशी चर्चा केली आहे. आणि टी-२० विश्वचषकानंतर लगेचच गंभीर, राहुल द्रविडकडून (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रं हाती घेईल,’ असं या सूत्राने दैनिक भास्करशी बोलताना सांगितलं आहे.  (Gautam Gambhir)

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) प्रशिक्षक पदासाठी तयार होताना बीसीसीआयला एक अटही घातली होती. तिच्या पूर्ततेनंतरच तो तयार झाला आहे, असंही दैनिक भास्करच्या बातमीत म्हटलं आहे. गौतम गंभीरला (Gautam Gambhir) सपोर्ट स्टाफ आपल्या मनाप्रमाणे बदलायचा आहे. नवीन निवडही मर्जीप्रमाणे करायची आहे. तसंही आताच्या सपोर्ट स्टाफची मुदत द्रविडबरोबरच संपत आहे. मुख्य प्रशिक्षक अनेकदा आपल्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ निवडताना दिसतात. (Gautam Gambhir)

(हेही वाचा- Bakrid ला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर लिहिले ‘राम’; ३ धर्मांधांना अटक)

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आधीचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगरना (Sanjay Bangarna) बदलून त्यांच्या जागी विक्रम राठोड यांना आणलं होतं. राठोड पुढे राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या कार्यकाळातही कायम राहिले. सध्या विक्रम राठोड यांच्याबरोबर गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत पारस म्हांब्रे. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलीप हे आहेत. (Gautam Gambhir)

गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुक होता, हे त्याने काही महिन्यांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. शिवाय आंतरराष्ट्रीय खेळाडू भारताच्या व्यस्त क्रिकेट कार्यक्रमात घरापासून दूर राहू इच्छित नव्हते. त्यामुळे गौतम गंभीर यांची निवड जवळ जवळ स्पष्ट होती. ‘भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक व्हायला कुणाला नाही आवडणार? तो एक मोठा बहुमान आणि गौरवाची गोष्ट आहे,’ असं गंभीर यांनी दुबईत असताना म्हटलं होतं.  (Gautam Gambhir)

(हेही वाचा- Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये १ दहशतवादी ठार, लपलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून शोध सुरू)

गौतम गंभीर (Gautam Gambhir) यंदा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर होता. आणि कोलकाताने आयपीएल जिंकली त्याचं श्रेय संघ मालक शाहरुख खाननेही गंभीरला दिलं होतं. (Gautam Gambhir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.