Kanchanjunga Express Accident : बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात; 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Kanchanjunga Express Accident इतका भीषण आहे की, मालगाडीचे ३ डबे तर रूळावरून घसरलेच; मात्र एक्स्प्रेसचा एक डबाही त्यावर चढला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

156
Kanchanjunga Express Accident : बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात; 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू
Kanchanjunga Express Accident : बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात; 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे रुळावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने धडक दिली असून त्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला सिलीगुडी ओलांडल्यानंतर रंगनपानी स्थानकाजवळ (Rangapani station) अपघात झाला. हा अपघात इतका भीषण आहे की, मालगाडीचे ३ डबे तर रूळावरून घसरलेच; मात्र एक्स्प्रेसचा एक डबाही त्यावर चढला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Kanchanjunga Express Accident)

(हेही वाचा – Bakrid ला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर लिहिले ‘राम’; ३ धर्मांधांना अटक)

सरकारी आणि खासगी रुग्णालये सतर्क

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन प्रवासी डबे आणि एका पार्सल डब्याचे नुकसान झाले आहे. (Railway Accident) या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. परिसरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क करण्यात आले आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रेल्वेचे अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. या अपघातानंतर रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला.

काय म्हणाल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी म्हटले आहे की, दार्जिलिंग जिल्ह्यातील फांसिडेवा भागात झालेल्या दुःखद रेल्वे अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली. डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. (Kanchanjunga Express Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.