T20 World Cup, India in Super 8 : ‘रोहित, विराट फॉर्ममध्ये नसले तरी बिघडत नाही,’ – संजय मांजरेकर 

127
T20 World Cup, India in Super 8 : ‘रोहित, विराट फॉर्ममध्ये नसले तरी बिघडत नाही,’ - संजय मांजरेकर 
T20 World Cup, India in Super 8 : ‘रोहित, विराट फॉर्ममध्ये नसले तरी बिघडत नाही,’ - संजय मांजरेकर 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघासाठी टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, India in Super 8) अमेरिकेतील टप्पा संपून आता वेस्ट इंडिजमधील सुपर ८ टप्पा सुरू झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २० जूनला अफगाणिस्तानशी होणार आहे. गटवार साखळीत भारतीय संघ अपराजीत राहिला. आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध संघाने निर्विवाद विजय मिळवले. तर कॅनडाचा सामना पावसात वाहून गेला. पण, या तीनही सामन्यांत भारतीय सलामीवीरांचं अपयश मात्र उठून दिसलं.  (T20 World Cup, India in Super 8)

(हेही वाचा- Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये १ दहशतवादी ठार, लपलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून शोध सुरू)

विराट कोहलीने (Virat Kohli) तीन सामन्यांत ५ धावा केल्या आहेत. तर रोहितने (Rohit Sharma) चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका खेळला आहे. आयर्लंड विरुद्ध त्याने अर्धशतक झळकावलं. पण, त्यानंतर दोन्ही सामन्यात तो खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळे मागणी होतेय सलामीची जोडी बदलण्याची. भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने विराट कोहलीला (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं मत व्यक्त केलं आहे. (T20 World Cup, India in Super 8)

‘विराट (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर आला तर दोन प्रश्न सुटतील. सलामीला यशस्वीला पाठवता येईल. रोहित (Rohit Sharma) आणि यशस्वी ही डावी-उजवी जोडी खेळू शकेल. यशस्वी गेल्यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये यशस्वी ठरला होता. तर विराटला आपली रणनीती ठरवायला थोडा वेळ मिळेल,’ असं जाफरने समालोचन करताना म्हटलं होतं. (T20 World Cup, India in Super 8)

(हेही वाचा- Kanchanjunga Express Accident : बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात; 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू)

दुसरीकडे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने (Sanjay Manjrekar) मात्र ठामपणे रोहित (Rohit Sharma) आणि विराटच्या बाजूने कौल दिला आहे. साखळी फेरीतील कामगिरीने स्पर्धेवर परिणाम होत नाही, असं मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणतो. ‘तुम्ही रोहित (Rohit Sharma) आणि विराटची संघात निवड केली आहे, याचा अर्थ तुम्ही अनुभवाला निवडलं आहे. दोघंही सगळ्यात अनुभवी खेळाडू आहेत. आणि अनुभवी, कसलेले खेळाडू हे मोठ्या सामन्यांचे खेळाडू असतात. आता ते चमकले नसले, तरी उपान्त्य किंवा अंतिम फेरीत ते कधीही चमकू शकतात. सुपर ८ मध्येही ते चांगलं खेळू शकतात,’ असं मांजरेकर (Sanjay Manjrekar) पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. (T20 World Cup, India in Super 8)

अनुभवी आणि नवोदित खेळाडूंची तुलनाही संजय मांजरेकरने करून दाखवली. ‘एखादा नवोदित खेळाडू अचानक बाद फेरीत चमकून गेला तर तो बोनस समजावा. १९९२ च्या विश्वचषकात इंझमाम उल हकने उपान्त्य आणि अंतिम सामना जिंकून दिला होता. पण, एरवी अनुभवी खेळाडूच मोठ्या स्पर्धेत बाद फेरीचं दडपण सहन करू शकतात, असा इतिहास आहे. त्यामुळे रोहित आणि विराटच्या आताच्या कामगिरीमुळे त्यांना डावलू नये,’ असं मत संजय मांजरेकरने (Sanjay Manjrekar) व्यक्त केलं. (T20 World Cup, India in Super 8)

(हेही वाचा- Ind-W vs SA-W : दक्षिण आफ्रिकन महिला संघावर भारतीय महिलांची १४४ धावांनी मात )

संजय मांजरेकरने (Sanjay Manjrekar) भारताकडून ३७ कसोटी आणि ७४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. सध्या प्रथितयश समालोचकाच्या भूमिकेत ते दिसतात. (T20 World Cup, India in Super 8)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.