Paris Olympic 2024 : भजन कौरची पात्रता स्पर्धेत सुवर्णाला गवसणी, अंकितासह मिळवला ऑलिम्पिक कोटा 

Paris Olympic 2024 : तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात भारताला तिसरा कोटा मिळाला आहे

102
Paris Olympic 2024 : भजन कौरची पात्रता स्पर्धेत सुवर्णाला गवसणी, अंकितासह मिळवला ऑलिम्पिक कोटा 
Paris Olympic 2024 : भजन कौरची पात्रता स्पर्धेत सुवर्णाला गवसणी, अंकितासह मिळवला ऑलिम्पिक कोटा 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) पूर्वीच्या शेवटच्या पात्रता स्पर्धेत भारताच्या अंकिता भाकट (Ankita Bhakt) आणि भजन कौर (Bhajan Kaur) यांनी तिरंदाजीत वैयक्तिक प्रकारात पात्रता कोटा मिळवला आहे. टर्की इथं झालेल्या स्पर्धेत भजन कौरने चक्क सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर अंकिता भाकटला (Ankita Bhakt) उपउपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. अनुभवी दीपिका कुमारी (Deepika Kumari) मात्र सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच गारद झाली. उपउपान्त्य फेरीतील प्रवेश ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवून देणार होता. दोघींनी ती कामगिरी केली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Kanchanjunga Train: पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताविषयी राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना, ‘X’वर पोस्ट करत म्हणाल्या…)

अंकिताने उप उपान्त्या फेरीत प्रवेश करेपर्यंत सामन्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवलं होतं.  रविवारी फिलिपिन्सच्या ग्रॅब्रिएल मोनिका बिडोरला तिने ६-० असं हरवलं. तर आधीच्या दोन फेऱ्यांमध्ये तिने इस्त्राएलच्या शेली हिल्टन आणि मिकेला मोश यांचाही तिने सरळ सेटमध्ये पराभव केला होता. (Paris Olympic 2024)

 उपउपान्त्य फेरीत अव्वल मानांकित खेळाडू इराणच्या मोबिना फलाहकडून मात्र तिचा पराभव झाला. अंकिताची साथीदार भजन कौरने स्पर्धेत सुवर्ण जिंकताना अंतिम फेरीत मोबिना फलाहचा ६-२ ने पराभव केला. १८ वर्षीय भजनने आशियाई क्रीडास्पर्धेतही सुवर्ण जिंकलं होतं. त्यामुळे तिच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा होतीच. आता तिरंदाजीत धीरज बोम्मादेवरा, अंकिता भाकट आणि भजन कौर अशा तीन खेळाडूंनी कोटा मिळवला आहे. (Paris Olympic 2024)

 रिकर्व्ह प्रकारात भारताला हे यश मिळालं आहे. सांघिक स्पर्धेत मात्र महिला व पुरुष संघ अपयशी ठरले आहेत. त्यांना आता ऑलिम्पिक प्रवेशासाठी चांगली क्रमवारी राखावी लागेल. अव्वल ८ देश ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरतात. सध्या दोन्ही भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सांघिक प्रकारात ऑलिम्पिक प्रवेश मिळाला तर तो देश वैयक्तिक प्रकारात प्रत्येकी ३ खेळाडू उतरवू शकतो. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.