Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख ठरली; ‘इथे’ मिळणार वाघनखांचं दर्शन

138
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख ठरली; 'इथे' मिळणार वाघनखांचं दर्शन
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख ठरली; 'इथे' मिळणार वाघनखांचं दर्शन

संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सर्व शिवप्रेमी ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते ती घोषणा अखेर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha) मदतीने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात भारतात आणली जाणार आहेत. ही वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha)

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाघनखं भारतात येणार

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवरायांची ही वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. म्हणजेच 1 जुलै ते 7 जुलैच्या तारखेदरम्यान ही वाघनखं भारतात दाखल होणार आहेत. जुलैपासून पुढील दहा महिने म्हणजेच 2025 च्या मे महिन्यापर्यंत ही वाघनखं या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha)

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं राज्यातील 4 वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरमधील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी ही वाघनखं पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून तीन वर्षांनी ती पुन्हा ब्रिटनला पाठवली जाणार आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha)

नियोजनासाठी 11 सदस्यांची समिती

लंडनवरुन ही वाघनखं राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाघनखं सुरक्षितपणे राज्यात आणण्याची जबाबदारी या 11 सदस्यांवर असणार आहे. तसेच राज्यामधील 4 संग्रहालयांमध्ये ही वाघनखं कधी, कुठे आणि कशी सर्वसामान्यांना पाहता येतील यासंदर्भातील सविस्तर नियोजन करण्याचं कामही याच 11 जणांकडे सोपवण्यात आलं आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha)

वाघनखं लंडनला कशी गेली?

शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक असलेली वाघनखं ही महाराजांच्या साताऱ्याच्या वारसदारांकडं होती. 1818 पर्यंत इंग्रजांनी संपूर्ण भारत खंगाळून टाकला होता. 1818 मध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटीश अधिकारी जेम्स ग्रँड डफ राजकीय हस्तक म्हणून साताऱ्याला काम करत होता. महाराजांचे तत्कालीन वारसदार प्रतापसिंह महाराजांनी ही वाघनखं डफला भेट दिली. डफने सातारा येथे 1818 ते 1824 या काळात काम केलं. 1824 मध्ये डफ वाघनखं घेऊन ब्रिटनला परतला. मात्र, डफच्या वारसदारांनी ही वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये ठेवायला दिली. (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.