Crime: बळी दिलेल्या जनावरांच्या यादीत गायींचा समावेश, मुस्लिम धर्मगुरुला अटक

त्यानंतर भरुच पोलिसांनी या पोस्टची दखल घेत मुस्लीम धर्मगुरुवर कारवाई केली.

235
CBI ची मोठी कारवाई; ED च्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक

बकरी ईदनिमित्त बळी दिल्या जाणाऱ्या जनावरांच्या यादीत गायींचा समावेश करणाऱ्या एका मुस्लीम धर्मगुरूला अटक करण्यात आली आहे.त्याने सोशल मीडियावर बळी दिलेल्या जनावरांची यादी पोस्ट केली होती. त्यानंतर भरूच पोलिसांनी या पोस्टची दखल घेत मुस्लीम धर्मगुरुवर कारवाई केली आहे. (Crime)

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मौलवी अब्दुल रहीम राठोड असं या मुस्लीम धर्मगुरूचं नाव आहे. तो अहमदाबादच्या भरुचमधील रहिवासी आहे. या मुस्लीम धर्मगुरूने २ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने बकरी ईदनिमित्त दिल्या जाणाऱ्या बळीच्या जनावरांची यादी दिली होती. या यादीत त्याने म्हशी आणि उंटाबरोबरच गायींचादेखील समावेश केला होता.

(हेही वाचा – Votebank चे राजकारण हे अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाशी संबंधित; NCERTच्या अभ्यासक्रमात भारतीय राजकारणाचे वस्तूस्थितीदर्शक वर्णन )

शांतता भंग करण्याचा प्रयत्न…
मुस्लीम धर्मगुरूने ही यादी पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भरुच पोलिसांनी या पोस्टची दखल घेत मुस्लीम धर्मगुरुवर कारवाई केली. शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं भरुच पोलिसांनी यावेळी सांगितलं.

कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल?
महत्त्वाचे म्हणजे या धर्मगुरुला २०२२ मध्येदेखील अटक करण्यात आली होती. जबरदस्तीने आदिवासींचे धर्मांतरण केल्याच्या आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी तो जामीनावर बाहेर होता. दरम्यान, जनावरांची यादी पोस्ट केल्यानंतर त्याला आता पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे तसेच त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (अ), २९५ (अ), ५०४ आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.