Maharaja Shivchhatrapati Pratishthan: ‘शिवसृष्टी’ला भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला मिळणार मोफत प्रवेशिका, कारण काय ? वाचा सविस्तर…

ही प्रवेशिका पुढील ३५० दिवस त्यांना कधीही एकदा वापरता येईल, अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी दिली आहे.

155
Maharaja Shivchhatrapati Pratishthan: 'शिवसृष्टी'ला भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला मिळणार मोफत प्रवेशिका, कारण काय ? वाचा सविस्तर...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात येत्या गुरुवारी, २० जून, २०२४ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाचे औचित्य साधत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नऱ्हे आंबेगाव येथे साकारलेल्या ‘शिवसृष्टी’मध्ये अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Maharaja Shivchhatrapati Pratishthan)

मोफत प्रवेशिकेचा ३५० दिवसांत वापर
या उपक्रमाचा एक भाग म्हणून शिवसृष्टीला (Maharaja Shivchhatrapati Pratishthan) भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार, दि 20 जून रोजी एक मोफत प्रवेशिका देण्यात येईल. ही प्रवेशिका पुढील ३५० दिवस त्यांना कधीही एकदा वापरता येईल, अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Crime: बळी दिलेल्या जनावरांच्या यादीत गायींचा समावेश, मुस्लिम धर्मगुरुला अटक)

विविध कार्यक्रमांचे आयोजन
यासंदर्भात अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी सर्वांत मोठी ऐतिहासिक घटना होती. छत्रपतींचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न या घटनेने संपन्न झाले आणि स्वराज्याला पहिले हिंदू छत्रपती सम्राट लाभले. या घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत असताना याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसृष्टीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवराज्याभिषेकाचे वर्णनात्मक भाषण
या कार्यक्रमांतर्गत गुरुवारी, २० जून रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमांची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून होईल. त्यानंतर दिवसभर विविध मान्यवर शिवसृष्टीला भेट देतील. यामध्ये हैदराबाद येथून नुकत्याच लोकसभा निवडणूक लढविलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माधवी लता या सायंकाळी ४ वाजता शिवसृष्टीला भेट देतील. याशिवाय राज्याभिषेकदिनी संपूर्ण दिवस प्रत्येक तासाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले शिवराज्याभिषेकाचे वर्णनात्मक भाषण दृकश्राव्य माध्यमातून शिवप्रेमींना शिवसृष्टी येथे पाहता येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.