Lok Sabha Adhiveshan : १० वर्षांनंतर लोकसभेला मिळणार विरोधी पक्षनेता

165
Lok Sabha President भाजपाचाच होणार; भर्तृहरि महताब, डी पुरंदेश्वरी यांच्या नावांची चर्चा
  • वंदना बर्वे

संसदेचे अधिवेशन येत्या २४ जून पासून सुरु होत आहे. भाजपाच्या घटलेल्या जागा आणि काँग्रेसच्या वाढलेल्या जागा लक्षात घेता हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. मात्र सर्वाधिक उत्सुकता लागली आहे ती याची की, १० वर्षांनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण असेल? (Lok Sabha Adhiveshan)

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. १८ व्या लोकसभेत इंडी आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. एकट्या काँग्रेसला यावेळी स्वबळावर ९९ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी लोकसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. हे पद १० वर्षांपासून रिक्त होते. (Lok Sabha Adhiveshan)

१८ व्या लोकसभेत इंडी आघाडीच्या सदस्यांची संख्या वाढल्याने १० वर्षांनंतर संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. लोकसभेच्या उपसभापतींची सुद्धा लवकरच निवड केली जाईल अशी आशा विरोधी पक्षनेत्यांना आहे. गेल्या पाच वर्षांपासून हेही पद रिक्त होते. (Lok Sabha Adhiveshan)

१७ व्या लोकसभेच्या संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात उपसभापतीपदी कुणाचीही निवड करण्यात आली नव्हती. याशिवाय, लोकसभेची ही सलग दुसरी टर्म होती, ज्यामध्ये विरोधी पक्षाचा नेता नव्हता. विरोधी पक्षनेतेपदासह उपसभापतीही मिळण्याची अपेक्षा असलेल्या कनिष्ठ सभागृहाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Adhiveshan)

(हेही वाचा – T20 World Cup, India in Super 8 : ‘रोहित, विराट फॉर्ममध्ये नसले तरी बिघडत नाही,’ – संजय मांजरेकर)

उपसभापती विरोधी पक्षाचा असतो

लोकसभेतील उपसभापतीचे पद हे नेहमीच विरोधी पक्षाला जाते. इंडी आघाडीने संसदेच्या रणनीतीवर अद्याप कोणतीही समन्वय बैठक बोलाविली नाही. तरीसुद्धा, सरकारने यावेळेस उपसभापती पदी कुणाची नेमणूक केली नाही तर विरोधी पक्ष शांत बसणार नाही, असे एका नेत्याने सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यानुसार, भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षांत एकाही उपसभापतीची निवड केली नाही. यावेळी ते उपसभापती निवडतील अशी अपेक्षा आहे. (Lok Sabha Adhiveshan)

विरोधी पक्षनेतेपद रिक्त का होते?

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेल्या १० वर्षांपासून रिक्त होते. २०१४ मध्ये काँग्रेसला ४४ तर २०१९ मध्ये ५२ जागा मिळाल्या होत्या. भाजपानंतर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तरीही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची मिळाली नव्हती. घटनेनुसार, विरोधी पक्षनेता होण्यासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी १० टक्के जागा कोणत्याही पक्षाकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे ५४३ जागांपैकी ५४ खासदारांची गरज आहे. (Lok Sabha Adhiveshan)

१७ व्या लोकसभेत काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या. परंतू गरज ५४ जागांची होती. दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळू शकले नव्हते. मात्र १८ व्या लोकसभेत विरोधी पक्ष नेते पद रिक्त राहणार नाही. कारण यावेळी काँग्रेसने स्वबळावर ९९ जागा मिळवल्या आहेत. अशा स्थितीत काँग्रेस खासदाराला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळणार आहे. (Lok Sabha Adhiveshan)

विरोधी पक्षनेत्याचे काम काय?

विरोधी पक्षनेतेपद हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याला संसदेत अधिकृत मान्यता मिळते. संसदेतील विरोधी पक्षाचा चेहरा असण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग असतो. (Lok Sabha Adhiveshan)

सीबीआय-ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संचालकांची निवड करताना विरोधी पक्ष नेत्यांचे मत विचारत घेतले जाते. पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती या सर्व निवडी करीत असते विरोधी पक्ष नेते त्या समितीचे सदस्य असतात. यावेळी काँग्रेस नेते यासाठी राहुल गांधी यांचे नाव पुढे करत आहेत. (Lok Sabha Adhiveshan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.