“४ जून रोजी अमोल कीर्तिकर जिंकले होते, पण…” वायव्य मुंबई लोकसभेच्या निकालावर Aditya Thackeray काय म्हणाले?

219
“४ जून रोजी अमोल कीर्तिकर जिंकले होते, पण...
“४ जून रोजी अमोल कीर्तिकर जिंकले होते, पण..." वायव्य मुंबई लोकसभेच्या निकालावर Aditya Thackeray काय म्हणाले?

वायव्य मुंबई लोकसभेचा निकाल संशयास्पद असल्याचं ठाकरे (Aditya Thackeray) गटाचं म्हणणं आहे. 19 व्या फेरीनंतर गडबड झाल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. याप्रकरणात ते कोर्टातही जाणार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘४ जून रोजी खासदार अमोल किर्तीकर जिंकले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घोळ सुरु होते. ६०० मतांनी जिंकले वगैरे समोर आलं. त्यानंतर ४८ मतांनी ते हरले असं समोर आलं. काल परवाकडेही बातम्या आणि पेपरच्या माध्यमांमधून वेगवेळे रिपोर्ट या संदर्भात समोर येत आहेत. आत फोन कोण घेऊन गेलं होतं? ओटीपी कुणाच्या मोबाइलवर आला? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.’ असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. (Aditya Thackeray)

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले ? (Aditya Thackeray)

“अमोल कीर्तिकरांच्या सीटबाबत कोर्टाची लढाई सुरु होणारच आहे. कारण ही जागा आम्ही जिंकलो आहोत. हुकूमशाहीच्या विरोधात मुंबईकरांनी जो निकाल दिलाय तो जगजाहीर आहे. मात्र यात जी गडबड झाली आहे त्यातल्या टेक्निकल गोष्टी आम्ही मांडू इच्छितो. निवडणूक निकाल आणि निवडणूक आयोग हे पाहिलं तर निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन नाही तर एंटरायली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन आहे. एका पक्षाच्या सांगण्यावरुन ते काम करत आहेत. सगळी गडबड करुनही इंडि आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे. ही गडबड झाली नसती तर सरकार बदललं असतं.” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. (Aditya Thackeray)

अनिल परब काय म्हणाले ?

“४ जूनला जो निकाल लागला त्यात अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. हा पराभव संशयास्पद आहे. आम्ही या विरोधात कोर्टात जात आहोत. निवडणुकीची एक प्रक्रिया असते. त्याद्वारे निवडणूक होत असते. यावेळी मात्र निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासण्यात आला आहे. १९ व्या फेरीनंतर ही प्रक्रिया डावलली गेली. निकाल जवळजवळ येत होते त्यावेळी पारदर्शकता बंद झाली. कुठल्याही मतदानाचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर की घोषणा केली जाते. मतं किती मिळाली ते सांगितलं जातं.” (Anil Parab)

६५० मतांचा फेरफार

“त्यानंतर दुसरा राऊंड सुरु होतो. १९ व्या फेरीपर्यंत हे सगळं बरोबर चाललं होतं. मात्र त्यानंतर गडबड करण्यात आली. पक्षाचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी असतात. कारण पक्षांची मतं जेव्हा कळतात तेव्हा उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर त्याचा ताळा मांडला जातो. टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधींमध्ये जाणीवपूर्वक अंतर ठेवण्यात आलं. मात्र एआरओच्या टेबलवरुन वेगळ्याच संख्या पाठवले जात होते. मतदान संपल्यानंतर १७ सी नावाचा फॉर्म असतो. त्यात किती मतदान असतं ते पेटीवर लिहिलेलं असतं. त्यावर सगळ्यांच्या सह्या असतात. हा फॉर्म टॅली होतो. की मतपेटीतली मतं तशीच आहेत का? दुसरा प्रकार असतो १७ सी पार्ट टू. त्यात मतमोजणीच्या दिवशी फॉर्म भरायचा असतो आणि दोन्हीची सरासरी बघायची असते. यावेळी अर्ध्या लोकांना हे फॉर्म देण्यात आले. अर्ध्यांना दिलेच नाहीत. ६५० मतांचा फेरफार करण्यात आला आहे.” असा आरोप अनिल परब यांनी केला. (Aditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.