राज्यात विविध भागांत जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra)प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर (Tourist Place) पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत कोणतीही दुर्घटना घडून यासाठी वनविभागाकडून (Forest Department) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्रसिद्ध सांदण दरी (Sandhan Valley) परिसर पुढील ४ महिने पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
सध्या भंडारदरा (Bhandardara) परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. सांदण दरी परिसरातील निसर्गसौंदर्यामुळे पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात भेट देतात. नाशिक (Nashik), मुंबई (Mumbai), पुणे (Pune), अहमदनगर (Ahmednagar) या भागांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourists) येथे पावसाळी सहलीसाठी येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील सर्वात मोठा सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Phone Hack : तुमचा मोबाईल हॅक तर झाला नाही ना ?)
पावसाळा संपेपर्यंत सांदण दरी परिसरात नो एन्ट्री
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे सांदण दरी आहे. प्रत्येक वर्षी देशभरातील हजारो पर्यटक सांदण दरीला भेट देत असतात, मात्र पावसाळ्यात या दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वन विभागाने ४ महिने सांदण दरी येथे प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये २रा क्रमांक
आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांदण दरी’चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. सांदण दरी २०० ते ४०० फूट खोल आणि जवळजवळ ४ किमी लांबवर पसरलेली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community