कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर (Durgadi Fort Kalyan) देवीचं मंदिर आहे, त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतात. त्या काळात हिंदू बांधवांना देवीचं दर्शन आणि पूजाही काही काळासाठी बंद ठेवण्यात येते. याचा निषेध म्हणून स्व. आनंद दिघे यांनी घंटानाद आंदोलन सुरु केले होते. दरवर्षी हे आंदोलन केले जाते. शिवसेनेत फूट झाल्यानंतर दोन्ही गटांकडून हे आंदोलन केले जात आहे. (Durgadi Fort Kalyan)
घंटानाद आंदोलन
बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली. यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उबाठा गटाने घंटानाद आंदोलन केलं. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. टिळक चौकातून घंटानाद करत शेकडो कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने आले आणि आंदोलन केले. (Durgadi Fort Kalyan)
ठाकरे गट व शिवसेना आमने-सामने
दुसरीकडे लालचौकी परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेळा ठरवून दिल्या होत्या. आधी शिवसेना शिंदे गट आंदोलनासाठी आले तर त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी आले. मात्र लालचौकी येथे यावेळी ठाकरे गट व शिवसेना आमने-सामने आल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना बाजूला केले. (Durgadi Fort Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community