West Bengal Train Accident : “आमच्या बोगीला अचानक जोरदार धक्का बसला आणि…” प्रवाशाने सांगितला अपघातावेळीचा प्रसंग!

257
West Bengal Train Accident : "आमच्या बोगीला अचानक जोरदार धक्का बसला आणि..." प्रवाशाने सांगितला अपघातावेळीचा प्रसंग!

पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सियालदहला जाणाऱ्या कंचनजंगा एक्स्प्रेसला (Kanchenjunga Express) मालगाडीची धडक (West Bengal Train Accident) लागल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात १५ जण ठार झाले तर ६० जण जखमी झाले. रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातानंतर एका प्रवाशांनी अपघातावेळी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली आहे. (West Bengal Train Accident)

(हेही वाचा –मुलींच्या शिक्षणावरून मनसे आक्रमक; Amit Thackeray यांचे चंद्रकांत पाटलांना पत्र, म्हणाले…)

या अपघातानंतर कंचनजंगा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने एनएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. यात त्याने अपघातावेळी नेमकं काय घडलं, हे सांगितलं आहे. तो म्हणाला, “ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मी बी १ कोचमध्ये होतो. आमच्या बोगीला अचानक जोरदार धक्का बसला. त्यानंतर सगळे जण अपघात झाला म्हणून ओरडत होते. काही जण रडायला लागले. मी बाहेर येऊन बघितलं तर मालगाडीने आमच्या एक्सप्रेसला धडक दिली होती.” अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली. पुढे बोलताना या अपघातामुळे आमच्या बोगीत अनेक जण जखमी झाले. तसेच काही लोकांचा मृत्यूदेखील झाला. यावेळी माझ्या डोक्यालाही मार लागला, असेही त्याने सांगितले. (West Bengal Train Accident)

(हेही वाचा –Maharashtra Sadan : नळाला नाही पाणी; केंद्रीय मंत्र्यांच्या अंघोळीसाठी मिनरल वॉटरचा वापर )

दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एनडीआरएफच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर लगेच बचावकार्य सुरु करण्यात आले. काही वेळातच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवदेखील घटनास्थळी पोहोचले. याठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलताना, मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच जे लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना अडीच लाख रुपये तर जे किरकोळ जखमी आहेत, त्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (West Bengal Train Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.