अंत्यविधी करण्यावरून नातेवाईकांमध्ये झालेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना नेपाळमधील नागरिकांनी मारहाण केल्याची घटना मुलुंड पश्चिम येथील स्मशानभूमीत घडली. या मारहाणीत महिला कॉन्स्टेबलसह ३ पोलिस जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी ६ नेपाळी नागरिकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. (Crime)
दिनेश थलारी, नवराज ठाकूर, अभिषेक थलारी, सचिन दास, सुनील थलारी, राहुल परिहार असे अटक करण्यात आलेल्या नेपाळी नागरिकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम येथील इंदिरा नगर या ठिकाणी राहणारा नेपाळी नागरिक पप्पू सिंग उर्फ नेपाळी याचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी पुणे, ऐरोली, मुंबई येथून त्यांचे नातेवाईक आले होते. पप्पू नेपाळी याचा मृतदेह मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणण्यात आला होता. (Crime)
(हेही वाचा – Punjab : मोफत विजेचा मान सरकारला झटका, कसे ते जाणून घ्या…)
मृतदेहावर अंत्यविधी करण्यावरून त्यांच्यात आपापसात भांडण झाले, त्यातील एकाने मृतदेहावर अंत्यविधी करण्यास नकार दिला, यावरून दोन गटांत स्मशानभूमीत तुफान हाणामारी सुरू झाली. या घटनेची माहिती मुलुंड पोलिसांना मिळताच पोलिसांचे गस्त वाहन स्मशानभूमी जवळ पोहचले व पोलिसांनी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता नशेत असलेल्या नेपाळी नागरिकांनी पोलिसांना लाठ्या काठ्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. (Crime)
या मारहाणीत पोलीस हवालदार संभाजी जाधव, दिनकर कुंवर आणि एक महिला कॉन्स्टेबल जखमी झाले. नेपाळी नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक स्मशानभूमीकडे मागविण्यात आली. पोलिसांनी ६ नेपाळी नागरिकांना ताब्यात घेऊन जखमी पोलिसांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान पोलिसांनी मृत इसमाच्या नातलगांना विश्वासात घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत ६ जणांना अटक केल्याची माहिती वपोनि. अजय जोशी यांनी दिली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community